खून प्रकरणी तिघांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. उत्पात यांनी मंगळवारी (ता. २९) हा निकाल दिला. 

उस्मानाबाद : चारचाकी वाहन अडवून तलवारीने खून केल्याप्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. उत्पात यांनी मंगळवारी (ता. २९) हा निकाल दिला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता के. डी. कोळपे यांनी सांगितले की, देवंग्रा (ता. भूम) येथील अमोल बापूराव टकले यांच्या पूर्वीच्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. अमोल हे चारचाकी वाहनाने प्रवास करीत होते. त्यांचे वाहन १० जणांनी अडवून तलवारीने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर, खांद्यावर वार केले. त्यामुळे अमोल जागेवर मरण पावले. मृताचे वडील बापूराव पंढरी टकले यांनी १७ सप्टेंबर २०१४ ला दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे सावरगाव परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिस निरीक्षक एच. बी. वाकडे यांनी याबाबतचा तपास केला. यामध्ये भक्कम पुरावे हाती लागले. त्यामुळे पोलिस निरीक्षक वाकडे यांनी पाच डिसेंबर २०१४ ला न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सरकारी पक्षाकडून एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता यांचा युक्तिवाद, परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्षदर्शींची साक्ष यावरून न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, १० हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three sentenced to life imprisonment in murder case Osamanabad news