एकीकडे बिहार निवडणूकीचा जल्लोष, दुसरीकडे झाडांना लागली आग!

मधुकर कांबळे
Wednesday, 11 November 2020

बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. याचा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला. उस्मानपुरा येथील भाजपच्या संपर्क कार्यालयासमोर ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा जल्लोष साजरा करत असताना जळता फटाका उडून दुभाजकामध्ये जाऊन पडला आणि त्यामुळे सुकलेले गवत, सुकलेल्या झाडांनी पेट घेतला.

औरंगाबाद : बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र हा जल्लोष साजरा करताना उत्साही कार्यकर्त्यांनी पेटवलेल्या फटाक्यांमुळे झाडांनी पेट घेतला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. याचा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला. उस्मानपुरा येथील भाजपच्या संपर्क कार्यालयासमोर ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा जल्लोष साजरा करत असताना जळता फटाका उडून दुभाजकामध्ये जाऊन पडला आणि त्यामुळे सुकलेले गवत, सुकलेल्या झाडांनी पेट घेतला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

झाडे पेटल्याचे लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी धावाधाव करत ती आग अटोक्यात आणली, मात्र तोवर सर्वत्र धूरच धूर झाला होता. या आनंदोत्सवात खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, विजया रहाटकर, शिवाजी दांडगे, समीर राजुरकर, राजगौरव वानखेडे, राजेश मेहता, बापु घडामोडे, सिद्धार्थ साळवे, अजय शिंदे, माधुरी अदवंत, लता दलाल आदींसह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trees caught fire Aurangabad while celebrating Bihar elections