esakal | उदगीरात आता चोवीस तास पोलिसांची गस्त!  
sakal

बोलून बातमी शोधा

udgeer petroling.jpg

तीन मोटरसायकलची शहरात चोवीस तास देणार गस्त. 

उदगीरात आता चोवीस तास पोलिसांची गस्त!  

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या पुढाकारातून उदगीर शहरात आता तीन मोटारसायकलद्वारे चोवीस तास गस्त घातली जाणार आहे. या तीन मोटारसायकली सोमवारी (ता.२) शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. 
उदगीर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी व होत असलेली वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पिंगळे यांनी उदगीरवर विशेष लक्ष दिले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरात गस्त घालण्यासाठी तीन मोटारसायकली देण्यात आल्या असून या मोटारसायकल वर गस्तीसाठी लागणारे सहा कर्मचारी सुद्धा लातूरहून तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी दिली आहे.
 महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना व आंध्र प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या उदगीर शहरात मोठी बाजारपेठ आहे. शहराचा विस्तार वाढत असताना समस्याही वाढत आहेत. गुन्हेगारी, रस्त्यावरील कोंडी त्याप्रमाणे दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलीस विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी चोवीस तास मोटरसायकल गस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पिंगळे यांनी उदगीर शहरात भेट देऊन मोटारसायकल वर गस्त घातली होती. या भागातील गुन्हेगारीचे व वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत असलेल्या विविध घटकाकडे त्यांनी लक्ष दिले असून यापुढील काळात हे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष घातले आहे. शहरात नव्याने दाखल झालेल्या तीन मोटरसायकलचे पोलीस निरीक्षक श्री चव्हाण, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, राजकुमार घोरपडे, श्रीकृष्ण चामे, विपीन मामडगे, गजानन पुल्लेवाड आदींनी पुष्पहार घालून स्वागत केले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)