
हिंगोलीत भीषण अपघात, नागरिक व पोलिसांमुळे एकाचा जीव वाचला
वारंगा फाटा (जि.हिंगोली) : येथुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व आयशरचा सोमवारी (ता.२३) सकाळी भीषण अपघात झाला. यातील ट्रकचालकाला वाचविण्यात स्थानिक नागरिक व पोलिसांना यश आले. नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर वारंगा फाटा येथील रामदेव बाबा हॉटेल समोर सकाळी ६.३० वाजता सोयाबीन घेऊन नांदेडकडे (Nanded) जाणाऱ्या आयशर (एमएच २६ बीई ३७७७) व हिंगोलीकडे (Hingoli) आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही ट्रक व आयशरचे केबिन पूर्णतः निकामी झाले आहेत. (Two Vehicles Accident On Hingoli Nanded Highway, Citizens And Police Save Truck Driver Life)
हेही वाचा: Aurangabad | धक्कादायक ! औरंगाबादेत पती-पत्नीचा निर्घृण खून, मुलगा फरार
त्यातील ट्रकचालक उस्मान नूर मोहम्मद (वय २५) हा गंभीर जखमी होऊन केबिनमध्ये अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बीट जमादार शेख बाबर हे दाखल झाले. अपघात घडल्याचे पाहून स्थानिक हॉटेल चालक राजू चौधरी व युवा नेते नितीन कदम हे देखील गंभीर चालकाच्या मदतीला दाखल झाले. स्थानिक नागरिक व पोलिसांनी अर्धातास अथक परिश्रम करून केबिनमध्ये अडकून पडलेला ट्रकचालक उस्मान नूर मोहम्मद यास बाहेर काढले व त्वरित नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.
हेही वाचा: औरंगाबाद : गणोरी फाट्याजवळ धावत्या कारने अचानक घेतला पेट
त्याची तब्येत स्थिर असून सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. नितीन कदम, राजू चौधरी व पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे ट्रकचालकाचे प्राण वाचले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी त्वरित मदत करावी, असे आवाहन बीट जमादार शेख बाबर यांनी केले.
Web Title: Two Vehicles Accident On Hingoli Nanded Highway Citizens And Police Save Truck Driver Life
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..