नदीत वीजप्रवाह सोडून मासेमारी बेतली दोन तरुणांच्या जिवावर!  

प्रकाश काळे 
Friday, 13 November 2020

नदीतील पाण्यात वीजप्रवाह सोडून मासेमारी करीत असताना विजेच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कावळ्याचीवाडी येथे गुरुवारी (ता.१२) रात्री घडली. समाधान सहदेव रूपनर (वय २३), दीपक मारुती रूपनर (२२, दोघेही, रा. कावळ्याचीवाडी) अशी मृतांची नावे आहेत. 

किल्लेधारूर (बीड) : नदीतील पाण्यात वीजप्रवाह सोडून मासेमारी करीत असताना विजेच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कावळ्याचीवाडी येथे गुरुवारी (ता.१२) रात्री घडली. समाधान सहदेव रूपनर (वय २३), दीपक मारुती रूपनर (२२, दोघेही, रा. कावळ्याचीवाडी) अशी मृतांची नावे आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कावळ्याचीवाडी गावानजीकच्या नदीत भरपूर मासे आहेत. नदीत ब्लिचिंग पावडर, लिक्विड क्लोरीन टाकण्यासह विजेचा प्रवाह सोडून मासेमारी करण्याच्या जीवघेण्या पद्धतीचा अवलंब तरुण करतात. काल रात्री समाधान व दीपकने नदीपात्रात वीजप्रवाह सोडून मासेमारी सुरू केली. त्यावेळी विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला. उशिरापर्यंत दोघे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता हा प्रकार उघड झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ऐन दिवाळीत गावावर शोककळा
कावळ्याचीवाडी गावावर ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे. गावातील दोन तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात चुलच पेटली नाही.  

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two young boy death when he catch fish in river beed news