esakal | उध्दव ठाकरेंना स्मृतिभ्रंश झाल्याने त्यांनी च्यवणप्राश घ्यावा ; कोण म्हणाले वाचा ?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भाजप व किसान मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कृषी विधेयक व ओला दुष्काळाबाबत आयोजित केलेल्या बैठकीनिमित्त भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे शुक्रवारी (ता.१६) परभणीत आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच त्यांनी शहरातील विविध ठिकाणी उपस्थित राहून शेतकरी संवाद मेळाव्याला हजेरी लावून मार्गदर्शन केले.

उध्दव ठाकरेंना स्मृतिभ्रंश झाल्याने त्यांनी च्यवणप्राश घ्यावा ; कोण म्हणाले वाचा ?

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असतानाच उध्दव ठाकरे यांनी पाहणी दौऱ्यातून आपदग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार व बागायतदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आर्थिक द्या, अशी मागणी केली होती. परंतू, सत्तेत येताच त्यांना या मागण्यांची विस्मृती झाली. त्यामुळेच त्यांचा झालेला स्मृतिभ्रंश दूर करण्याकरिता त्यांना च्यवनप्राशची गरज असल्याचा टोला भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री अनिल बोंडे यांनी शुक्रवारी (ता.१६) लगावला.

भाजप व किसान मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कृषी विधेयक व ओला दुष्काळाबाबत आयोजित केलेल्या बैठकीनिमित्त अनिल बोंडे शुक्रवारी (ता.१६) परभणीत आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या वेळी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामराव वडकुते, बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा डॉ.विद्या चौधरी आदींची उपस्थिती होती.
 
हेही वाचानांदेडला पावसामुळे तीन लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत 
 

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तुटपूंजे कर्ज वितरीत

श्री.बोंडे म्हणाले, यावर्षी शेतकऱ्यांना सरकार बरोबर बँकांद्वारे सुध्दा मदतीचा हात देण्यात आला नाही. विशेषतः पीक कर्ज वाटपाची यावर्षी परिस्थिती दयनीय राहिलेली आहे. ५० टक्केच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनही शेतकऱ्यांना तुटपूंजे कर्ज वितरीत केल्या गेले. मात्र, बगलबच्चांना हवे तेवढे पीक कर्ज देण्यात आले, असा आरोप श्री. बोंडे यांनी केला.

येथे क्लिक करानांदेडमध्ये ‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ लवकरच- एसपी प्रमोद शेवाळे -

पालकमंत्र्यांना पाहणीसाठी वेळ नाही  

आता झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असून शेतकरी उध्वस्त झाला आहे. तरी जिल्ह्यात ओल्या दुष्काळामुळे झालेल्या परिस्थितीकडे पाहण्याकरिता पालकमंत्र्यांना वेळ नसल्याची खंत श्री. बोंडे यांनी व्यक्त केली. आता शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर रब्बीची पेरणी देखील करता येणार नाही, अशी स्थिती आहे. भाजप सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना, ठिबक सिंचन योजना सह शेतकऱ्यांच्या हिताच्या असलेल्या विविध योजना या महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याबद्दल बोंडे यांनी तीव्र खंत व्यक्त केली.

संपादन ः राजन मंगरुळकर