उदगीर तालूक्यात बालविवाह; आठ जणांवर गुन्हा दाखल 

युवराज धोतरे 
Sunday, 2 August 2020

सोमवारी (ता.२७) डोंगरज (ता.चाकूर) येथील एका अल्पवयीन मुलीचा सकाळी अकराच्या सुमारास एका वृद्धाशी विधीवत विवाह लावला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुद्धा आणि टाळेबंदीचा फायदा घेत जाणीवपूर्वक विवाह लावून या कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार आशा बट्टेवाड (वय ३८) रा. मेवापुर (ता.जळकोट) यांनी दिली आहे.

उदगीर : येथील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या डोंगरज (ता. चाकूर) येथील एका मुलीचा बालविवाह लावल्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

याबाबत ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी (ता.२७) डोंगरज (ता.चाकूर) येथील एका अल्पवयीन मुलीचा सकाळी अकराच्या सुमारास एका वृद्धाशी विधीवत विवाह लावला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुद्धा आणि टाळेबंदीचा फायदा घेत जाणीवपूर्वक विवाह लावून या कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार आशा बट्टेवाड (वय ३८) रा. मेवापुर (ता.जळकोट) यांनी दिली आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

त्यांच्या या फिर्यादीवरून, आरोपी दिलीप बट्टेवाड रा. मेवापुर (ता.जळकोट), रंजनाबाई गायकवाड, गोविंद गायकवाड, धुपत गायकवाड, राम गायकवाड चौघेही डोंगरज (ता.चाकूर), छकुली बटेटवाड (रा. शिवनखेड), रुक्मिण भालेराव (रा. होडाळा) ता. मुखेड, पार्वती काबळे (रा. लोहारा) ता. उदगीर यांच्याविरुद्ध येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री गायके हे अधिक तपास करत आहेत.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

संपादन-प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgeer Child marriage eight People Against charged