esakal | Corona Update : उदगीरात एकवीस रुग्णांची वाढ : चौघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona death new.jpg

उदगीर शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी (ता.१९) एकवीस जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. एका कोरोना बाधित तर तीन सारी सदृस्य आजाराने अशा एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे

Corona Update : उदगीरात एकवीस रुग्णांची वाढ : चौघांचा मृत्यू

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : उदगीर शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी (ता.१९) एकवीस जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. एका कोरोना बाधित तर तीन सारी सदृस्य आजाराने अशा एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात नाईक नगर १, तिरुपती सोसायटी ३, दत्ता नगर १, एस टी कॉलनी १, गांधी नगर २, दुर्गा आर्केड ८, पारकट्टी गल्ली १, सनमित्र कॉलनी १, हंडरगुळी १, शनि मंदिर १ अशा एकूण एकवीस रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

शहर व परिसरात दिवसेंदिवस संसर्गाची परिस्थिती वाढत आहे. दररोज नवनवीन कोरोनाची बाधा  झालेले रुग्ण समोर येत आहेत. सध्या किट संपल्याने रॅपिड एंटीजन टेस्ट बंद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे किट उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

बुधवार पर्यंत येथील कोरोना रुग्णालयात उदगीर ६७९, जळकोट १७, निलंगा २, अहमदपूर ७, मुंबई ३, चाकूर १५, हैदराबाद १, मुखेड ७, देवणी २२, बिदर ५, पुणे १ शिरूर अनंतपाळ ३ अशा  कोरोणाची बाधा झालेल्या एकुण ७६२ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी ४४ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी ४१९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे.१३५ रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

सध्या कोविड रुग्णालयात ३८, लाॅयन्स नेत्र रूग्णालयात ४, जयहिंद वसतिगृह १९ तर तोंडारपाटी येथील कोविड केअर सेंटर येथे २२ अशा एकुण १०७ अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. देशपांडे यांनी दिली आहे.

Edited By Pratap Awachar
 

loading image
go to top