esakal | उदगीरातील कोरोनाबाधीत महिलेचा औरंगाबादेत मृत्यू, कोरोना बळींची संख्या पोचली १२ वर 
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

येथील कोरोनाची बाधा झालेल्या व औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेल्या एका जेष्ठ महीला रुग्णाचा उपचारादरम्यान शनिवारी (ता.११) पहाटेच्या सुमारास  मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आता बारा झाली आहे.

उदगीरातील कोरोनाबाधीत महिलेचा औरंगाबादेत मृत्यू, कोरोना बळींची संख्या पोचली १२ वर 

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : येथील कोरोनाची बाधा झालेल्या व औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेल्या एका जेष्ठ महीला रुग्णाचा उपचारादरम्यान शनिवारी (ता.११) पहाटेच्या सुमारास  मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आता बारा झाली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

गेल्या काही दिवसापूर्वी उदगीर मधील देगलूर रोड येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला व त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांची तपासणी केली असता पुन्हा दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

त्यांच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार दोघांना औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. पैकी विविध आजार असलेल्या ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

दिवसेंदिवस शहर व परिसरात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. टाळेबंदी शिथिल केल्याने बाजारपेठेत व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने संसर्गाचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यात हॉटेल सुरू झाल्याने धोक्यात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरात संसर्गजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

सध्या उदगीर येथील कोविंड रुग्णालय आणि तोंडार पाटी कोविड केअर सेंटर या दोन्ही ठिकाणी आज पर्यंत एकूण १६२ रुग्ण उपचारासाठी दाखल झालेली आहेत. त्यात उदगीर तालुक्यातील एकूण १४३ रुग्णांचा समावेश आहे. तर जळकोट- ३ , निलंगा - २ , अहमदपूर - ६ , चाकूर - ३ , मुंबई येथून आलेले - ३ रुग्ण, हैदराबाद येथून आलेला - १ रुग्ण, मुक्रमाबाद येथील १ रुग्ण असे एकूण १६१ जण उपचारासाठी दाखल झालेली आहेत. यापैकी आज पर्यंत एकूण १२० रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेले आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

येथील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान उदगीर तालुक्यातील-१०,  जळकोट तालुक्यातील -१ आणि निलंगा तालुक्यातील-१ अशा एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास व डॉ. देशपांडे यांनी दली आहे. 

संपादन : प्रताप अवचार