पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे शिवाजी मुळे

युवराज धोतरे 
Tuesday, 8 September 2020

येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे एकमेव सदस्य असलेले प्रा. शिवाजी मुळे यांची निवड झाली. अकरा विरुद्ध किती मताने निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यानी जाहीर केले आहे. येथील पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या काही सदस्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.

उदगीर (लातूर) : येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे एकमेव सदस्य असलेले प्रा. शिवाजी मुळे यांची निवड झाली. अकरा विरुद्ध किती मताने निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यानी जाहीर केले आहे. येथील पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या काही सदस्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

त्यासंदर्भात शुक्रवारी (ता.२८) ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अकरा विरुद्ध तीन मताने हा अविश्वास ठराव मंजूर झाला होता. उदगीरचे पंचायत समितीपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. ३० डिसेंबर २०१९ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती यांची निवड झाली होती. १४ सदस्य असलेल्या पंचायत समिती मध्ये भाजपा नऊ, काँग्रेस तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

३० डिसेंबर रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत सभापती, उपसभापती यांना भाजपा व महाआघाडीला समसमान प्रत्येकी सात मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे सभापती, उपसभापतीची निवड करण्यात आली होती. त्यात सभापतीपदी भाजपाचे विजय पाटील तर उपसभापती काँग्रेसचे बाळासाहेब मरलापल्ले यांची निवड झाली होती. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाआघाडीच्या वतीने बुधवारी (ता.१९) लातूरच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. शुक्रवारी (ता.२८) विशेष सभेचे आयोजन करून विश्वास मत घेण्यात आलेल्या मतदानात अकरा विरुद्ध तीन मताने ठराव मंजूर झाला होता. यात भाजपाचे सहा मते फुटली होती.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर सोमवारी {ता.८) नवीन सभापती निवडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अकरा ते एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी देण्यात आला होता. त्यात महाआघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.मुळे यांचा तर भाजपाकडून विद्यमान सभापती विजय पाटील असे दोन अर्ज दाखल झाले होते. दुपारी दोनच्या नंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत तेरा विरुद्ध तीन मताने प्रा.मुळे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस बसवराज पाटील नागराळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले रामराव बिरादार, सोपानराव ढगे, अजित पाटील, मुकेश भालेराव आदींनी उपस्थिती नोंदवून सत्कार केला.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgeer Panchayat Samiti new Chairman NCP Shivaji mule