esakal | Corona Update : उदगीरात सारीने दोघांचा मृत्यू; आज नऊ पॉझिटिव्हची भर, बांधितांचा आकडा २१७ वर
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (ता.१८) रात्री उशिरा आलेल्या अहवालात नऊ जणांना कोरोणाची बाधा झाली आहे. येथील कोविड रुग्णालयात रात्री उशिरा दोन जणांचा सारीने मृत्यू झाला आहे. परिसरातील कोरोनाची बाधा झालेल्यांची एकुण संख्या आता २१७ वर पोहचली आहे.

Corona Update : उदगीरात सारीने दोघांचा मृत्यू; आज नऊ पॉझिटिव्हची भर, बांधितांचा आकडा २१७ वर

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर  (लातूर) : शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (ता.१८) रात्री उशिरा आलेल्या अहवालात नऊ जणांना कोरोणाची बाधा झाली आहे. येथील कोविड रुग्णालयात रात्री उशिरा दोन जणांचा सारीने मृत्यू झाला आहे. परिसरातील कोरोनाची बाधा झालेल्यांची एकुण संख्या आता २१७ वर पोहचली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

रात्री उशिरा आलेल्या अहवालात कुणेकरो गल्ली ३, गाधीनगर १, उस्माननगर १, नळगीर २, गुडसुर १, सायगाव (कर्नाटक) १ एवढ्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी रात्री रात्री साडेनऊ वाजता शहरातील रामनगर भागातील एका नागरिकाचा सारीने मृत्यू झाला आहे.अकरा वाजता शहरातील एका सारीच्या महीला रुग्णाचा मृत्यू झाला असून याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

येथील कोरोना रुग्णालयात उदगीर १९१, जळकोट ३, निलंगा २, अहमदपूर ६, मुंबई ३, चाकूर ३, हैदराबाद १, मुखेड ४, देवणी ४ अशी कोरोणाची बाधा झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी १५ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी १३० रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

सात रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. सध्या कोविंड रुग्णालयात ३४ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे १८ रुग्णांवर उपचार चालू आहेत. पैकी चार रुग्णांची स्थिती गंभीर असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

(संपादन : प्रताप अवचार) 

loading image