Corona Breaking :  उदगीरात दोन महसूल अधिकारी, डॉक्टरांना कोरोना: पोलिस निरीक्षक होम क्वारंटाईन  

युवराज धोतरे 
Sunday, 26 July 2020

कोरोना लढ्यामध्ये गेल्या चार महिन्यापासून लढा देणारे महसूल विभागातील दोन कर्तव्यदक्ष अधिकारी, कोरोना रुग्णांना सेवा देणारे दोन डॉक्टर व त्यांचे तीन कर्मचारी, ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यात महत्वाच्या पदावर कर्तव्य बजावणारे तीन पोलीस कर्मचारी, शहरातील तीन नामांकित खाजगी डॉक्टर यांना कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात उपचार करावे लागत आहेत.

उदगीर (जि.लातुर) : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोना लढ्यात अग्रगण्य असणाऱ्या महसूल विभागातील दोन अधिकारी, आरोग्य विभागातील दोन, तर तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

कोरोना लढ्यामध्ये गेल्या चार महिन्यापासून लढा देणारे महसूल विभागातील दोन कर्तव्यदक्ष अधिकारी, कोरोना रुग्णांना सेवा देणारे दोन डॉक्टर व त्यांचे तीन कर्मचारी, ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यात महत्वाच्या पदावर कर्तव्य बजावणारे तीन पोलीस कर्मचारी, शहरातील तीन नामांकित खाजगी डॉक्टर यांना कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात उपचार करावे लागत आहेत.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

शनिवारी (ता.२५) रात्री उशिरा आलेल्या अहवालात शहरातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात हावगीस्वामी महाविद्यालयाजवळ एक, शेल्हाळ एक, सन्मित्र कॉलनी एक व मोमीनपुरा येथील एकाचा समावेश आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

सद्या येथील कोरोना रुग्णालयात उदगीर २४३, जळकोट ३, निलंगा २, अहमदपूर ६, मुंबई ३, चाकूर ४, हैदराबाद १, मुखेड ४, देवणी ५, पुणे १, बिदर १ अशा कोरोणाची बाधा झालेल्या २७३ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी १९ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी १७५ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे.अकरा रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. सध्या कोविंड रुग्णालयात ३४ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे २४ रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतिश हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

दोन पोलीस निरीक्षक  क्वारंटाईन  
येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण याना होम  क्वारंटाईन  करण्यात आले आहे. दोन्ही पोलीस निरीक्षकांचे त्यांच्या पॉझिटिव्ह पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरनटाईन केले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घारगे तर शहरचा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.

(संपादन प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgeer Two Revenue Officer Doctor Corona positive