esakal | Ganesh Utsav : उदगीरात होणार बेचाळीस श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती बाप्पा.jpg

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सव संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे या बैठकीत ठरले.

Ganesh Utsav : उदगीरात होणार बेचाळीस श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : यावर्षी कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवावर मर्यादा आल्या असल्या तरीही शहर व तालुक्यात एकूण बेचाळीस गणेश मंडळांनी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेऊन परवानगी काढली आहे.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सव संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे या बैठकीत ठरले. सध्या पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून परवाने देण्यात येत आहेत.उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने एकूण बावीस सार्वजनिक गणेश मंडळांना पाच दिवसाचे ऑनलाइन परवाने देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी दिली आहे.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांच्या अधीन राहून शहर पोलीस ठाण्याच्या वतीने एकूण शहरातील वीस सार्वजनिक गणेश मंडळांना सात दिवसाचे ऑनलाइन परवाने देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी दिली आहे. विसर्जन मिरवणुका व विविध गर्दी होतील असे धार्मिक कार्यक्रम यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. या अनुषंगाने सर्वांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात  

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top