पुण्यावरून परतलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीचा उमरग्यात मृत्यू, उद्या पर्यंत मृतदेह ठेवणार रुग्णालयात ?

अविनाश काळे
गुरुवार, 2 जुलै 2020

येथील उपजिल्हा रूग्णालयात गुरूवारी (ता. दोन) सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील एकोंडी (जहागिर) येथील एका ५२ वर्षीय नागरिकाचा मृत्यु झाला. हा व्यक्ती आजारी होता. सकाळी पूणे येथून गावाकडे आला होता. उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रूग्णालय प्रशासनाने त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला असून मृतदेह शितगृहात ठेवण्यात आला आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : येथील उपजिल्हा रूग्णालयात गुरूवारी (ता. दोन) सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील एकोंडी (जहागिर) येथील एका ५२ वर्षीय नागरिकाचा मृत्यु झाला. हा व्यक्ती आजारी होता. सकाळी पूणे येथून गावाकडे आला होता. उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रूग्णालय प्रशासनाने त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला असून मृतदेह शितगृहात ठेवण्यात आला आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

उमरगा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसात दहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात गुंजोटीच्या एका तरुणाचा समावेश आहे. कोरोनाचा शिरकाव आता शहरात सुरु झाला असून बुधवारी (ता. एक) पॉझिटिव्हच्या संपर्कातील ५७ स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आज रात्री नऊनंतर प्राप्त होणार आहे. गुरुवारी (ता. दोन) रुग्णालयात स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू होती. जवळपास चाळीसहुन अधिक स्वॅब घेतले जात आहेत. स्वॅब घेण्याचे किट्स संपत आल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून किट्स मागवण्यात आले आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

दरम्यान उमरग्यातील स्थिती भयावह असताना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास एकोंडी (जहागिर ) येथील एका ५२ वर्षीय व्यक्ती गंभीर अवस्थेत दाखल झाला होता. तातडीने त्याचा स्वॅब घेण्यात आला. कांही वेळाने तो दगावला. सध्या त्याचा मृतदेह शितगृहात ठेवण्यात आला असून शुक्रवारी (ता. तीन ) रात्री अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे नोडल ऑफिसर डॉ. पंडीत पुरी यांनी सांगितले.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

मयत व्यक्ती हा पुण्यात कामानिमित्त राहतो. लॉकडाउन सुरु झाल्यानंतर तो गावाकडे आला होता. कारहुन्नवी सणानंतर तो परत पुणे येथे गेला होता. तेथे तो आजाराने त्रस्त होता. त्याचा मृत्यू नेमके कोणत्या कारणाने झाला याची माहिती स्वॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होईल.
__


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga 52 old person death in umarga hospital corona swab report waiting