esakal | Corona-Virus : आता उमरग्यात होणार खाजगी कोविड रुग्णालय 
sakal

बोलून बातमी शोधा

download.jpg

किचकट नियमावलीमुळे येणाऱ्या अडचणीमुळे खाजगी उपचार बंद होते. मात्र आता सात डॉक्टर्सच्या टीमने खाजगी कोविड रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनाकडून त्यासाठी आवश्यक बाबीची पूर्तता करुन मान्यता घेण्याचे प्रयत्न अंतीम टप्प्यात आहेत.

Corona-Virus : आता उमरग्यात होणार खाजगी कोविड रुग्णालय 

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहर व तालूक्यात वाढत्या रूग्ण संख्येमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. मध्यंतरी खाजगी रुग्णालयात कोविड संशयितावर उपचार सुरु होते. मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर व रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन व्हावे लागत होते.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

किचकट नियमावलीमुळे येणाऱ्या अडचणीमुळे खाजगी उपचार बंद होते. मात्र आता सात डॉक्टर्सच्या टीमने खाजगी कोविड रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनाकडून त्यासाठी आवश्यक बाबीची पूर्तता करुन मान्यता घेण्याचे प्रयत्न अंतीम टप्प्यात आहेत. दरम्यान खाजगी डॉक्टर्स कोविड रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले असून मंगळवारपासुन (ता. २८) सरकारी कोविड रुग्णालयात सेवेला सुरूवात केली आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

उमरगा शहर कर्नाटक सिमेलगत असल्याने उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील रुग्ण येथील खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतात. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खाजगी रुग्णालयातील उपचारावर कांही बंधने आली. गरिब रूग्णासाठी या रुग्णालयाचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे बहुतांश रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. मात्र तेथील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना रेफर करावे लागत होते. आता नव्याने आठ व्हेंटिलेटर कार्यान्वित झाल्याने उपचारासाठी सुलभता निर्माण झाली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

खाजगी डॉक्टर्सची रूग्णसेवा सुरू

येथील आयएमएने कठीण परिस्थितीत कोविड रुग्णाच्या सेवेसाठी सतरा तज्ञ डॉक्टर्सची यादी तयार केली आहे. त्यातील अकरा डॉक्टर्सचे वेळापत्रक निश्चित झाले असून मंगळवारी पहिल्या दिवशी तीन सिफ्ट प्रमाणे डॉ. दिपक पोफळे, डॉ. विजय पाटील, डॉ. सचीन शेंडगे यांनी ड्यूटी केली. वेळापत्रकाप्रमाणे उर्वरीत डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी रहाणार आहेत. दरम्यान डॉ. सचीन शेंडगे, डॉ. अभय शिंदे, डॉ. अनिकेत इनामदार, डॉ. सतीश नरवडे, डॉ. विजय बेडदुर्गे, डॉ. मल्लीकार्जुन खिचडे, डॉ. पराग वाघमोडे यांच्या टीमने खाजगी कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

महिन्यातील रुग्णसंख्या १७०

सोमवारी रात्री आलेल्या २३ पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमुळे महिनाभरातील संख्या १७० झाली आहे. त्यात शहरातील १२७, ग्रामीणमधील ४७ तर कर्नाटकातील एक रूग्ण आहे. आत्तापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याने एकुण पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मृत्यू दर वाढतो आहे. मंगळवारपर्यंत १०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ५३ रुग्णावर उपचार सुरू आहेत. दरम्यान सोमवारी घेतलेल्या १८७ जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे.


" खाजगी डॉक्टर्स कोविड रुग्णांच्या सेवेत सक्रिय झाले आहेत. स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवारी वैद्यकिय अधिक्षकांच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून मान्यतेनंतर रुग्णालय सुरू होईल,
- डॉ. प्रशांत मोरे, सचिव आय.एम.ए. उमरगा

Edited by pratap awachar

loading image