धक्कादायक ! या शहरात प्रतिबंधित क्षेत्राचा आकडा झाला एवढा..वाचून होसाल थक्क...!   

umarga restricted area.jpg
umarga restricted area.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : गेल्या तीन आठवड्यात उमरगा शहरातील रुग्ण संख्या ६७ झाल्याने शहरवासिंयामध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. दरम्यानच्या काळात तीस प्रतिबंधित क्षेत्र करावे लागले. त्यातील नऊ क्षेत्र कालावधी संपल्याने उठवण्यात आले. तर सद्यस्थितीत २१ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील हॉयरिस्क लोकांची यादी घेण्याचे आणि प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे काम वेळेत होत नाहीत. पालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामे गतीने होत नसल्याने प्रशासनाने अन्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामासाठी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

उमरगा शहरात सर्वप्रथम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक बाधित व्यक्ति आढळून आला होता. तो रोगमूक्तही झाला. त्यानंतर मे महिन्यात मुंबई-पूणे कनेक्शनमुळे रूग्ण संख्या थोडी वाढली परंतू ती कांही दिवसात आटोक्यात आली. मात्र २७ जूनपासुन शहरातील रूग्ण संख्येत वाढ सुरू झाली ती अजूनही थांबत नाही. शुक्रवारपर्यंत रूग्णसंख्या ६१ होती. शनिवारी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर शहरातील एका प्राध्यापकासह तिच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. 

रविवारी हमीद नगर येथील टीव्ही दुरूस्त करणाऱ्या एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या ६७ झाली आहे. दरम्यान आत्तापर्यंत शहरात वेगवेगळ्या तीस ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले होते त्यातील नऊ क्षेत्र मुदत संपल्याने उठवण्यात आले तर सध्या २१ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. मूळ प्रश्न आहे तो प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांच्या सर्वेचा आणि तो भाग निर्जुतीकीकरण करण्याचा. नेमके ही कामे पूर्ण करायला बराच वेळ जात आहे. पालिकेचे पदाधिकारी गांभिर्याने लक्ष देत नाहीत. जेमतेम २२ कर्मचाऱ्यावर सर्वे बरोबरच अन्य कामाचा ताण पडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना कामासाठी घेतल्यास शहरातील सर्वेचे काम गतीने होईल आणि आरोग्याच्या दृष्टीने कमकुवत असलेल्या लोकांवर वेळेत योग्य ते उपचार करता येतील.

क्वारंटाईन सेंटरची वाणवा आणि असुविधा ! 
शहर व तालुक्यात रूग्ण संख्येत वाढ होत असून ती संख्या १११ पर्यंत पोहचली आहे, आणखी ९२ स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. अशा स्थितीत तपासणीसाठी आलेल्या व अहवालानंतर चौदा दिवस क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या इन्स्टुटिशनल क्वारंटाइनसाठी शहरात सर्व सुविधा यूक्त इमारती नाहीत. मंध्यतरी एका महाविद्यालयाच्या मुलीचे वस्तीगृह यासाठी आरक्षित करण्यात आले मात्र तेथे रुग्ण रहाण्यास नकार देऊन होम क्वारंटाइनमध्ये राहिले. शहरातील बहुजनहिताय वस्तीगृह व मुरुम येथे कोरोना केअर सेंटरमध्ये रूग्ण पाठवावे लागत आहेत. शहरात चांगल्या सोयी - सुविधांचे क्वारंटाइन केंद्र सुरू झाले तर रुग्णांना चौदा दिवसाचा कालावधी पूर्ण करण्यासाठी कांही वाटणार नाही, त्यासाठी प्रशासकिय स्तरावरून ही कारवाई होणे गरजेचे आहे.
(संपादन : प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com