उमरग्यात कोरोना संसर्ग वेगात, रूग्णसंख्या चौदाशेवर, मृत्यूदर २.६३ टक्क्यावर. 

अविनाश काळे 
Sunday, 13 September 2020

बाधित रुग्णांवर मोठ्या जोखीमेतून करावे लागताहेत उपचार

उमरगा : शहरातील संपूर्ण उपजिल्हा रूग्णालय कोविड रुग्णालय केल्याने येथे कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रील, मे महिन्यात साधारणतः सतरा रुग्ण बाधित होते. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून संसर्ग वाढत गेला आणि अडीच महिन्यात रुग्णसंख्येने चौदाशेचा आकडा पार केला. दरम्यान आयसोलेशन कक्षात रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर्स आणि कर्मचारी मोठ्या जोखीमेतुन काम करत असून बारा डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे तीन शिफ्ट प्रमाणे काम सुरू आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
उमरगा शहर व तालुक्यात प्रारंभी रुग्णसंख्या नगण्य होती. मुंबई, पूणे कनेक्शन वाढल्याने हळूहळू रुग्ण संख्या वाढली. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून संसर्ग झपाट्याने सुरू झाला. प्रशासनाने संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय केले. कोविड केअर सेंटर सूरू करण्यात आले. सरकारी कोविड रुग्णालयात आयसीयूची स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. रूग्णाच्या औषधोपचाराची सोय, तब्येची विचारणा आणि नाष्टा व दोन वेळा भोजनाची व्यवस्था करण्यासाठी डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना आयसोलेशन कक्षात जावे लागते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

किटचे संरक्षण असले तरी मनात भिती असतेच ; तरीही कर्तव्य म्हणून कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. वैद्यकिय अधिक्षक डॉ.अशोक बडे  यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे बारा डॉक्टर्स आणि जवळपास सव्वाशे कर्मचाऱ्यांना प्रति आठ तासाची ड्यूटी आहे. एका शिफ्टमध्ये एक डॉक्टर, एक सिस्टर, एक ब्रदर, एक शिपाई व एक सफाई कर्मचारी काम करतात. नोडल ऑफीसर डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. प्रविण जगताप, डॉ. यशवंत पाटील, डॉ. बस्वराज दानाई, डॉ. विनोद जाधव, डॉ. कोमल गरड, डॉ. वैशाली चाकोते, डॉ. सुनंदा सुर्यवंशी, डॉ. रमेश थोरात, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. सोमनाथ कवठे, डॉ. मुलगीर, डॉ. पुरी, डॉ. बिराजदार, परिचारिका डोंगरे, भालेराव, गावडे, अज्ञान जाधव यांच्यासह कर्मचारी शिफ्ट प्रमाणे राऊंड घेतात.  

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१,०४५ जण झाले कोरोनामूक्त ; मृत्यू दर २.६३ टक्के
अडीच महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शनिवारी (ता.१२) सांयकाळपर्यंत एक हजार ४०३ रुग्णसंख्या झाली आहे त्यात शहरात  ६७५ (४८.१०), ग्रामीण ७२८ (५१.९०), रोगमूक्त एक हजार ४५ ( ७४.४८) मृत्यू ३७ (२.६३) तर उपचारासाठी ३२१ रुग्ण आहेत. दरम्यान आतापर्यत दोन हजार ६९३ अन्टीजेनच्या चाचण्या झाल्या त्यात २३४बाधित व्यक्ती आढळून आल्या.

 

संसर्ग वाढत चालल्याने रोगमूक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे टिम वर्कमधून जोखीम पत्करून यशस्वी काम सुरु आहे. कांही मोजक्या कर्मचाऱ्यांना बाधा झाली ; तरीही न डगमगता डॉक्टर्स व कर्मचारी काम करताहेत. नागरिकांनाही न खचता उपचाराला साथ देण्याची गरज आहे. 
- डॉ. अशोक बडे, वैद्यकिय अधिक्षक

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga Corona Update last Two and half month total Patient 1400