Umarga Corona Update : तिसऱ्या दिवशीही धक्का; ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

अविनाश काळे
गुरुवार, 30 जुलै 2020

उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी आणखी वाढतच चालली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही रुग्ण संख्येचा आकडा वाढलेला असून बुधवारी (ता.२९) रात्री आलेल्या अहवालात ३२ जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

उमरगा : उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी आणखी वाढतच चालली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही रुग्ण संख्येचा आकडा वाढलेला असून बुधवारी (ता.२९) रात्री आलेल्या अहवालात ३२ जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

कोरोना संसर्गाने समूह संपर्कात घेराव घातल्याने रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ३२ पॉझिटिव्ह मध्ये कांही व्यापारी, किराणा दुकानदार, हॉटेल मालकांचे नातेवाईक व पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा सहभाग आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शहरातील २६ संख्या आहे त्यात कोळीवाडा नऊ, जुनी पेठ येथील पाच, काळे प्लॉट तीन, हमीद नगर दोन, पिस्के प्लॉट एक, शिंदे गल्ली एक, इंदिरा चौक एक, अजयनगर एक, उपजिल्हा रुग्णालय एक, भारत विद्यालय एक, पोलिस ठाण्याजवळ एक, महादेव गल्ली एक तर  ग्रामीणमधुन तुरोरी तीन, कोरेगाव एक, व्हंताळ एक, दाबका येथील एक असे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान मंगळवारी घेतलेल्या १७७ स्वॅब पैकी ३२ पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी तर तब्बल २०२ स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहेत. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

महिभरात रुग्ण संख्या झाली २४८ 
बुधवारी रात्री आलेल्या ३२ पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमुळे महिनाभरातील संख्या २४८ झाली आहे. शहरातील १९१ तर ग्रामीणमधील ५७ संख्या झाली असून महिनाभरात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited By Pratap Awachar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga corona Update today 32 new corona patient