Corona-Virus : उमरगा पालिकेचे वीस कर्मचारी पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३३७ वर

corona.jpg
corona.jpg

उमरगा (जि. उस्मानाबाद) : पालिकेच्या जवळपास वीस कामगार, कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, शिवाय कांही जणांचे अहवाल अनिर्णयीत तर कांही जणांचे अहवाल आणखी प्राप्त व्हायचे आहेत. पालिकेतच संसर्ग घुसल्याने प्रशासनाने तूर्त कांही दिवसासाठी  हुतात्मा स्मारकातील पालिकेच्या वाचनालयात कामकाज सुरू केला आहे. तेथे तूर्त कोविड संदर्भातीलच कामकाज सुरू असून नियमित कामकाज लवकरच मुख्य कार्यालयात सुरू होईल. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

शहर व तालुक्यात गेल्या ३५ दिवसात वाढलेल्या रुग्णसंख्या चिंताजनक आहे. प्रत्यक्ष स्वॅबची संख्या वाढत चालल्याने आरोग्य विभागासह महसूल विभागाची चांगलीच धावपळ होत होती. संसर्ग लवकर अटोक्यात येण्यासाठी चाचणी गतीने व्हावी म्हणुन अॅन्टीजेंन टेस्टची मागणी होत होती. 

याबाबत शुक्रवारी (ता. ३१) सकाळ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंढे यांनी शनिवारी (ता.एक) उमरग्यासाठी दोनशे तर मुरुमसाठी शंभर किट्स पाठविले होते. १०५ टेस्टमध्ये सहा पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी आलेल्या ३२, पूर्वीचे आणि शनिवारी सायंकाळी प्रलंबित स्वॅबमधील चार पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या ३३७  झाली आहे.

 शहरातील कोविड रुग्णालयातून गुरूवारी पाठवण्यात आलेल्या १०८ स्वॅब नमुन्याचा अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाला त्यात शहरातील १६ तर ग्रामीण भागातील १६ असे ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात दोन दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या एका जेष्ठ नागरिकाचा समावेश आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता ३३७ झाली असून शहरात २४९, ग्रामीण ८८ झाली आहे. त्यात चौदा जणांचा मृत्यू झाला असून १२४ बरे होवून परतले. तर २०१ जणांवर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान शनिवारी एकही स्वॅब घेतलेला नाही, मात्र अॅन्टीजेंट टेस्ट घेण्यात आल्या. उमरग्यात पन्नास पैकी पाच पॉझिटिव्ह आले असून शहरातील जुनी पेठ येथील दोन महिला, एकोंडी रोड येथील एक महिला, एस.टी. कॉलनी, महादेव गल्ली येथील प्रत्येकी एक आहेत. मुरुममध्ये घेतलेल्या ५५ पैकी एक पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आलेला नाही हे दिलासादायक आहे.

मुरुमची रिपोर्टिंग स्वतंत्र ; उमरग्यात नवीन कोरोना केयर सेंटर

उमरगा येथील कोविड रुग्णालयातील दररोजच्या रिपोर्टिंगचा भार कमी करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने शनिवारपासून मुरूम येथे स्वतंत्र रिपोर्टिंग करण्यात येत आहे. शहरात एकच कोरोना केअर सेंटर आहे, रूग्णसंख्या वाढत चालल्याने प्रशासनाने कोरेगाव रोडलगतच्या मिनाक्षी मंगल कार्यालयात नवीन कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी पाठविलेल्या १४२ स्वॅबचा अहवाल शनिवारी रात्री प्राप्त होईल. त्यातही धक्कादायक अहवाल येण्याची शक्यता वाटते.

Edited BY Pratap Awachar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com