
उमरगा कोविड रुग्णालयात अतिगंभीर रुग्णावर ऑक्सीजन पुरवठा करणारी सक्षम यंत्रणा नसल्याने रुग्णांना रेफर करावे लागत असल्याने अशा स्थितीत रुग्णाचा मृत्यू होतो आहे.
उमरगा (उस्मानाबाद) : कोरोना विषाणू संसर्ग वाढल्याने बाधितांची संख्या वाढत आहेत. त्यात पन्नासी ओलांडलेल्या आणि दुर्धर व्याधीने त्रस्त असलेल्या लोकांवर मृत्यूचा दुर्देवी प्रसंग ओढावण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान गुरुवारी (ता.१६) रात्री येथील कोविड रूग्णालयात दोघांचा तर शहरातील एका महिलेला उपचारासाठी उस्मानाबादच्या शासकिय रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यु झाला आहे. कोविड रुग्णालयात अति गंभीर रुग्णावर ऑक्सीजन पुरवठा करणारी सक्षम यंत्रणा नसल्याने रुग्णांना रेफर करावे लागत असल्याने अशा स्थितीत रुग्णाचा मृत्यू होतो आहे.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील एका व्यक्तीवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागातील रोड कारकुनाला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. कोविडच्या नियमावलीनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान शहरातील एका शिक्षकाची पत्नी उपचारासाठी गुरुवारी सकाळी कोविड रूग्णालयात दाखल झाली. तिच्या शरिरात ऑक्सीजनचे प्रमाण ३५ असल्याने रुग्णवाहिकेत ऑक्सीजनची जूळवाजुळव करुन उस्मानाबादच्या शासकिय रुग्णालयात दुपारी पोहचवण्यात आले. मात्र उपचार सुरु करण्यापूर्वीच तीचा मृत्यू झाला. तिचा अहवाल निगेटिव्ह आला; तरीही संभाव्य धोका टाळण्यासाठी शनिवारी दुपारी उस्मानाबाद येथे कोविड नियमावलीनुसार अंत्यविधी उरकण्यात आला.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
सक्षम यंत्रणेची गरज
कोविड रूग्णालयात आयसीयू उपचाराचे दहा बेड असल्याचे सांगण्यात आले. मात्र अति गंभीर रुग्णावर उपचारासाठी असलेले तज्ञ डॉक्टर्स आणि व्हेंटिलेटरची पुरेशी सोय नसल्याने कठीण परिस्थितीत रेफर केल्यानंतर रुग्ण दगावत आहेत. दरम्यान गेल्या एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात विविध आजाराने खाजगी रुग्णालयात जवळपास ९० जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे, त्यात कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याची आकडेवारी नगण्य आहे, मात्र हदयरोग, मधूमेह, रक्तदाब आदी दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या व पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तीची संख्या अधिक आहे. कोरोना आजार जेष्ठांच्या मुळावर आल्याने त्यांच्यावर योग्य ती अत्याधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रशासकिय स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत. सरकारी आरोग्य यंत्रणेत खासगी व्यवसायातील तज्ञ डॉक्टर्सना सामावुन घेण्याची वेळ आली आहे.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
....अखेर मृत्यूची झूंज संपली
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून शहर व तालुक्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात २७ जूनला बालाजी नगर येथील पॉझिटिव्ह आलेल्या एका कॉन्ट्रॅक्टरवर सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर येथे कोविड नियमावलीनुसार अंत्यविधी उरकण्यात आला.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
आणखी चार रुग्णांची भर
गुरुवारी पाठविलेल्या १९ स्वॅबचा अहवाल शुक्रवारी रात्री बारा वाजता प्राप्त झाला. त्यात शहरातील पतंगे रोड परिसरातील आरोग्य सेविकेचा पती, एक ३५ वर्षीय तरुण तर सानेगुरूजी नगर येथील एका विनाअनुदानित इंग्लिश स्कुलचा कर्मचारी आणि मूळज येथील एका जेष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन इनकल्युसिव्ह तर तेरा निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान २१ दिवसातील रुग्णसंख्या ९३ तर आत्ता पर्यंत ११० झाली आहे, त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
"कोविड रुग्णालयात आयसीयूची सुविधा आहे. दुर्धर आजाराच्या व्याधीने त्रस्त असलेल्या व्यक्तींवर चांगल्या पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात रेफर करावे लागते. व्हेंटिलेटरसारखे अत्याधुनिक साहित्याची मागणी करण्यात आली असून त्याची लवकरच उपलब्धता होईल. - डॉ. अशोक बडे, वैद्यकिय अधिक्षक
(संपादन : प्रताप अवचार)