Corona Update : उमरग्यात पंधरा दिवसात आढळून आले ५६ पॉझिटिव्ह रुग्ण 

अविनाश काळे
Saturday, 11 July 2020


उमरगा :  खाजगी डॉक्टराचा अहवाल पॉझिटिव्ह ; उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकेसह पती, मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह 

उमरगा : मागच्या अडीच महिन्यात आढळून आलेल्या सतरा पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर सोळा जण कोरोनामूक्त झाले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसात कोरोनाचा कहर झाल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती संख्या ५६ वर पोहचली आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.१०) मध्यरात्री आलेल्या अहवालात शहरातील एक खाजगी डॉक्टर्ससह तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

शहर व तालुक्यात कोरोना संसर्गामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. आठ व नऊ तारखेला पाठवण्यात आलेल्या पंधरा स्वॅबचा अहवाल शुक्रवारी (ता.१०) दुपारी प्राप्त झाला, त्यात १४ जण निगेटिव्ह आले तर उपजिल्हा रुग्णालयातील एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आली आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

खाजगी डॉक्टराचा अहवाल पॉझिटिव्ह

शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात सतरा पैकी चार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पहिल्यांदाच एका खाजगी डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, परिचारिकेचा एक मुलगा, कुंभारपट्टी भागातील एक सेवानिवृत्त शिक्षक तर मुरुमचा एक चहावाल्याचा समावेश आहे. तो मुरुम शहरातील पहिला रुग्ण आहे. दरम्यान परिचारिकेचा पती पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला होता आता मुलासह एकाच घरातील तिघे पॉझिटिव्ह आले आहेत. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी काढलेल्या आदेशानुसार शहरातील खाजगी डॉक्टर्सचा रूग्णालय परिसर, कुंभारपट्टी भाग तर मुरूमच्या चहावाल्याचा रहिवाशी भाग, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून हा भाग शनिवारी (ता.११) सील करण्यात आला आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

आत्तापर्यंत झाली ७४ रुग्ण संख्या

उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ७४ रूग्ण संख्या झाली आहे. त्यात  गेल्या पंधरा दिवसात तब्बल ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. उमरगा शहरातील रुग्ण संख्या ३४ झाली असून संसर्ग वाढत असल्याने शहरवासिय कमालिच्या दडपणाखाली आहेत.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

औषध विक्रेत्याचा मृत्यू

शुक्रवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयात एका औषधी विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला याची अधिकृत माहिती स्वॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून गोर- गरिबांसाठी साध्या आजारावर औषधे देऊन आजार बरा करणारा एक औषध विक्रेता म्हणुन त्याची ओळख होती मात्र त्याच्या पार्थिवावर कोविड नियमांनुसार आरोग्य कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. 

संपादन : प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga found 56 positive patients in 15 day