उमरगा तालूक्यात ७३.५५ टक्के झाले मतदान!

उमरगा मतदान.jpg
उमरगा मतदान.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी उमरगा तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रियेला मंगळवारी (ता. एक) सकाळी आठ वाजता सूरूवात झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण मूळ रहिवाशी असलेल्या उमरगा-लोहारा तालुक्याच्या "होम ग्रॉऊंड" मधील मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

मतदान केंद्राच्या बाहेर महाविकास आघाडी व भाजपाचे उमेदवार शिरीश बोराळकर यांच्या कार्यकर्त्यांचे पेन्डाल उभे होते. दरम्यान शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मतदारांची संख्या जास्त असल्याने मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. ३५ उमेदवार संख्येमुळे मतपत्रिकेचा आकार मोठा असल्याने सोळा घड्या मारण्यासाठी विलंब होत होता त्यामुळे दुपारी दोन वाजता एक मतदान कक्ष वाढवण्यात आले. 

उमरगा तालुक्यात पाच हजार ३२३ मतदार असून दहा मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील जिल्हा परिषद प्रशाला, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, पंचायत समिती सभागृह असे तीन केंद्र आहेत. तर ग्रामीण भागात श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी, जिल्हा परिषद कन्या प्रशाला मुरूम, जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा नारंगवाडी, जिल्हा परिषद शाळा मुळज, जिल्हा परिषद शाळा मुळज, जिल्हा परिषद शाळा बेडगा, जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा बलसूर, जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा दाळींब या सात शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली.

दुपारी दोन पर्यंत एकुण दोन हजार २७५ ( ४२.७४ ) मतदान झाले होते. सांयकाळी पाचपर्यंत एकूणच तीन हजार ९१५ ( ७३.५५) मतदान झाले. त्यात पुरुष मतदान तीन हजार २२७ तर स्त्री मतदान ६८८ झाले आहे. गुंजोटी व मुरुम येथे शेवटच्या वेळेत मतदार आल्याने वेळेनंतरही मतदान करून घेण्यात आले. दरम्यान श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मतदारांची संख्या जास्त असल्याने दुपारी उपविभागीय अधिकारी विट्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार विलास तरंगे यांनी केंद्रात नव्याने दुसरे मतदान कक्ष सुरू केले. या तिघांनी याच केंद्रावर मतदानही केले.

बसवराज पाटील यांनी केले मतदान

औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मुरुमच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील मतदान केंद्रावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी मतदान केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, माजी अध्यक्ष बापुराव पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड , अॅड. अभयराजे चालुक्य आदी राजकीय नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com