esakal | पक्ष्यांमधला अनोखा स्नेहभाव : कोंबडी करते मोरांच्या पिल्लाचे पालन पोषण 
sakal

बोलून बातमी शोधा

ambajogai.jpg

आधुनिक व यांत्रिकी युगात माणसं, माणसापासून दूर चालली आहेत. जातिभेद, विषमतेचीही दरी वाढू लागली आहे. परंतु पक्षात मात्र असा कुठला भेद दिसत नाही, इथे चक्क कोंबडीच मोरांच्या पिल्लांचे पालन पोषण करून सांभाळ करते आहे. माणसात अशी माणुसकी कधी निर्माण होईल हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा चर्चेचा ठरला आहे. 

पक्ष्यांमधला अनोखा स्नेहभाव : कोंबडी करते मोरांच्या पिल्लाचे पालन पोषण 

sakal_logo
By
प्रशांत बर्दापुरकर

अंबाजोगाई (बीड) : आधुनिक व यांत्रिकी युगात माणसं, माणसापासून दूर चालली आहेत. जातिभेद, विषमतेचीही दरी वाढू लागली आहे. परंतु पक्षात मात्र असा कुठला भेद दिसत नाही, इथे चक्क कोंबडीच मोरांच्या पिल्लांचे पालन पोषण करून सांभाळ करते आहे. माणसात अशी माणुसकी कधी निर्माण होईल हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा चर्चेचा ठरला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शनिवारी (ता.१४) आधार माणुसकीचे प्रमुख अॅड. संतोष पवार यांच्यासोबत तालुक्यातील मंगईवाडी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना दिवाळी निमित्त फराळ देण्यासाठी टीम गेली होती. शेतकरी रामदास शिंदे यांनी पाच वर्षापूर्वी आत्महत्या केली. त्यामुळे या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आधार माणुसकीने घेतली आहे. दरवर्षी त्यांना फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड केली जाते. हा फराळ दिवाळी देताना त्यांच्या घराच्या अंगणात कोंबड्यामागे दोन मोराची पिल्लं फिरताना दिसली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पिल्लांना दिला आधार 
रामदास शिंदे यांचा मुलगा राहुल हा बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेतो. महाविद्यालय बंद असल्याने सध्या तो घरीच आहे. एक दिवस शेतात फिरताना त्याला गवतावर चार अंडी दिसली, ती कोणत्या पक्षाची आहेत. हेही त्याला माहीत नव्हते. इतर कोणाचा पाय पडून ती फुटतील म्हणून त्याने ती अंडी आपल्या घरी आणून कोंबडी जवळ ठेवली. त्या कोंबडीने ते चारही अंडे उबवले, असता त्यातून मोराच्या पिल्लांनी जन्म दिला. आता हेही पिल्लं आपलेच आहेत. असे समजून त्या कोंबडीने या मोराच्या पिल्लांचेही पालन, पोषण सुरू केले. हळू, हळू ही पिल्ले कोंबडी सोबत फिरू लागली. चार दिवसाने यातील दोन पिल्लांना घारीने उचलून नेले. राहिलेली दोन मोराची पिल्लं आता महिन्याची झाली आहेत. ही कोंबडी स्वतःच्या पिल्लापेक्षा मोराच्या पिल्लांना माया व प्रेम देते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोंबडीच घेते काळजी 
राहुल शिंदे यांचे घर एका पत्र्याच्या छताचे व कुडाचे आहे. डोंगर, ते दऱ्यांच्या कुशीत आहे. या परिसरात वृक्षवल्लीही मोठ्या प्रमाणात असल्याने मोरांचीही संख्या भरपूर आहे. या पिल्लांना वाचवण्यासाठी आम्ही त्यांचा सांभाळ केला, परंतु आमच्यापेक्षा कोंबडीच त्यांच्यावर जास्त लक्ष देते असे राहुलने सांगितले. आता ही पिल्ले मोठी झाल्यावर त्यांच्या समूहात आपोआप गेली तर चांगलेच, न गेल्यास त्यांना त्यांच्या समूहात सोडून देणार असल्याचे राहुलने सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)