esakal | दुसऱ्याचे पितळ उघडे पाडायला गेला अन स्वतःच सापडला!
sakal

बोलून बातमी शोधा

crime news 1.jpg

दुसऱ्याचे वाईट करायला गेल्यानंतर काय होईल हे अनेकांना सांगण्याची गरज नाही. मात्र शहरातील नांदेड नाक्याजवळच्या वस्तीत राहणाऱा एक तथाकथित कार्यकर्ता दुसऱ्याचे पितळ उघडे पाडायला गेला अन स्वतः सापडून पडला. याबाबतची चर्चा ऐन दिवाळीत शहरात अत्यंत चवीने चर्चिली जात आहे. 

दुसऱ्याचे पितळ उघडे पाडायला गेला अन स्वतःच सापडला!

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (उस्मानाबाद) : दुसऱ्याचे वाईट करायला गेल्यानंतर काय होईल हे अनेकांना सांगण्याची गरज नाही. मात्र शहरातील नांदेड नाक्याजवळच्या वस्तीत राहणाऱा एक तथाकथित कार्यकर्ता दुसऱ्याचे पितळ उघडे पाडायला गेला अन स्वतः सापडून पडला. याबाबतची चर्चा ऐन दिवाळीत शहरात अत्यंत चवीने चर्चिली जात आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


गेल्या चार दिवसापासून शहरातील एका पोलिस ठाण्याला एका ठिकाणी जुगाराचा अड्डा चालू असल्याचे वारंवार फोन येऊ लागले. पोलिसाकडून काहीच कार्यवाही होत नसतानाही त्यांनी पोलीसाचा पिछा सोडला नाही. 
हा तथाकथित कार्यकर्ता एवढे फोन का करत आहे? हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी काढण्याचे ठरवले व त्यादृष्टीने माहिती मिळवली असता या पट्ट्याचाच क्लब शहरालगतच्या एका घाटात सुरू असल्याचे कळले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यातील काही मालदार पारंगत खेळाडू दुसऱ्या अड्ड्यावर बैठकीसाठी जात असल्याने त्याची तक्रार हा करत असल्याचे पोलिसांना लक्षात आले असावे. या पोलिसांनी त्याच अड्ड्यावर छापा मारून कार्यवाही केली. सध्या दिवाळीचा सण असून गेल्या अनेक महिन्यांपासून बाहेरगावी असलेली मंडळी आता घरी आली आहे. मग या मित्रांच्या भेटी व काहीतरी करमणुकीचे साधन म्हणून शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणावर अनधिकृत क्लब सुरू झाली असल्याची चर्चा आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यातच जुगार अड्डयाची माहिती सांगणाऱ्याचीच माहिती काढून त्याच्याच अड्ड्यावर पोलिसांनी धाड आली व त्याला सोडून इतरावर गुन्हे दाखल केले. हा नेमका काय प्रकार आहे? याची चर्चा शहरात ऐन दिवाळीत अत्यंत चवीने चर्चिली जात आहे.

हा तथाकथित कार्यकर्ता कोण?
शहरालगतच्या एका घाटात जुगाराचा अड्डा चालणारा हा तथाकथित कार्यकर्ता कोण? याची जोरदार चर्चा चालू आहे. या तथाकथित कार्यकर्त्याला राजकीय वलय असल्याचेही बोलले जात आहे. या तथाकथित कार्यकर्त्याच्या अड्ड्यावर धाड टाकून नेमके याचं नाव वगळण्यात मागचं रहस्य काय? नेमके या कार्यकर्त्याला साथ देणारा राजकीय नेता कोण? याचीही चर्चा नागरिकात सुरू आहे.

(संपादन-प्रताप अवचार)