लातूर : अनलॉक ठरला धोकादायक ! या महिन्यातील रुग्णसंख्या वाचून तुम्ही होसाल थक्क... 

latur unlock down.jpg
latur unlock down.jpg

लातूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरु केले होते. पण गेल्या महिन्यापासून अनलॉक करुन काही शिथिलता देण्यात आली होती. पण लातूरकरांनी शासनाने दिलेल्या नियमांचे सातत्याने उल्लंघन केल्याने अनलॉक लातूरकरांसाठी धोकादायक ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा दोन हजार १२८ इतका झाला आहे. यातील जुलै या एकाच महिन्यात सुमारे अठराशे जण कोरोनाने बाधित झाले आहेत. जिल्ह्यासाठी ही धोक्याचीच घंटा आहे.

नागरीकांच्या वागण्यात सुधारणा हवी
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्वच घटकावर परिणाम होत आहे. गरीब, सामान्य घटकावर तर त्याचा अधिक परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरु केली. काही शिथिलता दिली. पण त्याचा उलटा परिणाम होतान दिसत आहे. मास्क वापरणे, शारिरिक अंतराचा नियमाचे पालन करणे असे साधे उपाय सांगूनही त्याकडे नागरीकांचे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम बाधितांची संख्या वाढत आहे.

कारवाई करून पोलिसही थकले
या रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून मार्चपासून पोलिस रस्त्यावर आहेत. दररोज शेकडो नागरीकांवर ते कारवाई करीत आहेत. त्यांच्या कारवाईचा धडाका आजही सुरुच आहे. कोट्यावधी रुपयांचा दंडही पोलिसांनी वसूल केला आहे. दंड आणि दंडुक्याचा धाक त्यांनी दाखवला. चार महिन्यापासून रस्त्यावर असलेले पोलिसही कारवाई करून थकले आहेत.

रुग्ण वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन
जुन, जुलैमध्ये काही दिवस अनलॉक प्रक्रिया राबवली गेली. यात नागरीकांनी नियमाचे सातत्याने उल्लंघन केले. याचा परिणाम रुग्ण संख्या वाढत गेली. जिल्ह्यात एप्रिलमध्ये केवळ १६ बाधित होते. मेमध्ये १२० तर जूनमध्ये २१८ जणांनी कोरोनाची लागण झाली. एकट्या जुलैमध्ये एक हजार ७७४ जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे प्रशासनाने पहिल्यांदा ता. १५ ते ३१ जुलैचा लॉकडाऊन केला. आता ता. एक ते १५ ऑगस्टचा लॉकडाऊन केला आहे. आता तरी नागरीकांनी सावध होण्याची गरज आहे.

बाधितांची आकडेवारी

  • एप्रिल -१६
  • मे -१२०
  • जून---२१८
  • जुलै--१७७४
  • एकूण--२१२८

गेल्या काही दिवसात वाढलेले रुग्ण

ता. २३ जुलै -८९

ता. २४ जुलै -६१

ता. २५ जुलै - ७२

ता. २६ जुलै - ८८

ता. २७ जुलै - १२०

ता. २८ जुलै - १०४

ता. २९ जुलै - १०३

ता. ३० जुलै -१२७

ता. ३१ जुलै --१३९

Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com