Hingoli Rain| हिंगोलीत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस; हळद, भुईमूग काढणीस व्यत्यय

हिंगोलीत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
Hingoli Rain Upates
Hingoli Rain Upatesesakal

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. दोन वेळेस अवकाळी पाऊस देखील झाला. परत रविवारी (ता.१५) सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. चार वाजता हिंगोली शहर व परिसरात केवळ मेघगर्जना झाली तर औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील काही गावात वादळी वारे व विजेच्या कडकडाटात पाऊस (Rain) झाला. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे कमालीची उष्णता वाढली आहे. तापमान ४० अंशावर आहे. दरम्यान मागच्या आठवड्यात दोन वेळेस अवकाळी पाऊस झाला. रविवारी देखील सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. (Untimely Rain In Hingoli District, Farmers In Trouble)

Hingoli Rain Upates
राम मंदिर घोटाळ्यावर राहुल गांधींची टीका; म्हणाले, रामाच्या नावावर...

सायंकाळी चार वाजता हिंगोली शहर व परिसरात केवळ मेघगर्जना झाली तर औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील अनेक गावात वादळी वारे व विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावर पाणी जमा झाले होते. औंढा नागनाथ तालुक्यात भुईमूग पिकाची काढणी व हळद शिजविण्याचे काम सुरू असल्याने अवकाळी पावसाने याला व्यत्यय आला असुन पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Hingoli Rain Upates
Latur Accident | अहमदपुरात कारच्या धडकेत तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

हा पाऊस औंढा शहरासह तालुक्यातील वगरवाडी, गोळेगांव सुरेगाव सुकापुर, शिरडशहापुर, उमरा, चोंढीशहापुर, नागेशवाडी आदी गावात झाला आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र पाच वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com