जिद्द अन् मेहनतिच्या जोरावर अक्षयने साकार केले युपीएससीचे स्वप्न…

गजानन सपकाळ 
Tuesday, 4 August 2020

सनदी अधिकारी बनण्याचे ध्येय बाळगले होते. ते साध्य करण्यासाठी दिल्ली गाठली. जिवाचे रान करुन अभ्यास केला आणि यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळविले.

वरुड बुद्रुक (जालना) : संगणक शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. परंतु, सनदी अधिकारी बनण्याचे ध्येय बाळगले होते. ते साध्य करण्यासाठी दिल्ली गाठली. जिवाचे रान करुन अभ्यास केला आणि यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळविले. जाफराबाद तालुक्यातील बेलोरा येथील अक्षय दिनकर भोसले यांची ७०४ रँकने निवड झाली. अक्षयचे मूळ गाव बेलोरा हे छोटेसे खेडे असूनसुद्धा त्यांनी यश संपादन केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

वडिल दिनकर भोसले बेलोरा येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असून चार एक्कर जमीन आहे. फारशी अडचणी आल्या नाहीत. ज्या आल्या त्यावर निर्धाराने मात केली. आपल्या यशात आयपीएस विशाल नरवडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही अक्षयने नमूद केले. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

याबाबत वडील दिनकर भोसले म्हणाले, की मुलाच्या ध्येय प्राप्तीसाठी कुठलीही कसर ठेवली नाही. कोणत्याही प्रकारची वेगळी गुंतवणूक न करता फक्त अक्षयच्या शिक्षणावरच खर्च केला, त्यातच भावांनी दिलेल्या सहकार्यानेच अक्षयला समोर नेऊ शकलो. आई संगीता भोसले यांनी मोठ्या कष्टाने अक्षयने ध्येय साध्य केल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला, असे आनंदाने उद्गार काढले. काका मनोहर भोसलेंनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शनही त्याला मोलाचे ठरले. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

अक्षयचा यशाचा अजेंडा 
अक्षयने बुलढाणाच्या सहकार विद्यामंदिरात पहिली ते तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने जालन्याच्या जैन इंग्लिश स्कुलमध्ये तसेच बारावी एस .बी. महाविद्यालय औरंगाबादेत पूर्ण केले. त्यानंतर अभियांत्रिकी शासकीय महाविद्यालयातून संगणक शाखेत शिक्षण पूर्ण केले. परंतु, सनदी अधिकारी बनण्याची तीव्र इच्छा मनात बाळगल्यामुळे त्यांनी थेट दिल्ली गाठली.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

योग्य नियोजन, अचूक मार्गदर्शन आणि जिद्दीने तयारी सुरू केली. त्यामुळे या परीक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाले. दरम्यान, अक्षय मार्च २०२० मध्ये भारतीय वन सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. दरम्यान, आता त्यांचे प्रशासन किंवा पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Edit- Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upsc result 2019 jalna district akshay Bhosale success story