esakal | बीड झेडपीला झालाय रिक्तरोग!  
sakal

बोलून बातमी शोधा

beed zp image.jpg

मागीतलेले भेटतच नाही; नको म्हणालेले लादणे सुरुच

बीड झेडपीला झालाय रिक्तरोग!  

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : आले शासनाच्या मना तिथे कोणाचेही चालेना असेच जिल्हा परिषदेच्या बाबतीत सुरु आहे. क व ड संवर्गाची साडेआठशेंवर पदे रिक्त आहेत. भरतीला शासन तयार नाही, अनुकंपा भरतीतही खोडा पडला आहे. शासनस्तरावरुन भरतीची अ व ब संवर्गाची दिडशेंवर पदे रिक्त आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शासन स्तरावरुन भरतीची पदे भरण्याची मागणी करुन जिल्हा परिषद प्रशासन थकले. पण, पदे काही भरली जात नाहीत. मात्र, दुसरीकडे शिक्षक संवर्गाची पदे अनेक वर्षांपासून अतिरिक्त असल्याने आमच्याकडे शिक्षक पाठवू नका, असे अनेक पत्र धाडुनही शासन अंतरजिल्हा बदलीने शिक्षक पाठवायचा धडाका थांबवायला तयार नाही. आपल्या जिल्ह्यात आल्याचे तात्पुरते समाधान माणून घेणाऱ्या शिक्षकांना पदेच नसल्याने पदस्थापना, वेतन आदी प्रश्नांसाठी मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे न्यायालयीन वाद, संघटनांच्या तक्रारींमुळे प्रशासनालाही अनेक कटकटींना सामोरे जावे लागत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भरतीच नसल्याने रिक्त पदांचा प्रश्न
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा, पंचायत, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, वित्त व लेखा, बांधकाम आदी विविध विभागांत साडेआठशेवर गट क व ड संवर्गाची साडेआठशेंवर पदे रिक्त आहेत. मात्र, मागच्या काही वर्षांपासून भरतीच नसल्याने रिक्त पदांमुळे कारभार चालविताना जिल्हा परिषद प्रशासनाला तारेवारची कसरत करावी लागत आहे. आता प्रशासनाने अनुकंपा भरतीची प्रक्रीया हाती घेतली. त्यातून साधारण ७० पदे भरली जाऊन थोडाफार हातभार लागणार तोच यातही खोडा बसला. 

थकले पण गट अ व ब ची दिडशेंवर पदे रिक्तच
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत गट अ व गट ब संवर्गाची १५१ पदे रिक्त आहेत. शासन स्तरावरुन बदलीने भरली जाणारी ही पदे भरण्याची मागणी करुन जिल्हा परिषद प्रशासन थकले. पण, शासनाला काही घाम फुटायला तयार नाही. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या काळात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी गट अ व ब संवर्गाची तब्बल २३ पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागातील या दोन्ही संवर्गाच्या रिक्त पदांचा आकडा तब्बल ५७ आहे. त्यामुळे प्रभारीराजवर कारभार सुरु आहे. 

दुसरीकडे नका म्हणले तरी बदल्या सुरुच
एकिकडे इतर पदे भरण्याची मागणी करुन थकलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाची मागणी मान्य करायला शासन तयार नाही. दुसरीकडे शिक्षकांच्या मंजूर पदांपेक्षा जिल्हा परिषदेत शिक्षकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात अंतरजिल्हा बदलीने शिक्षक पाठवू नयेत असे शासनाला कळवूनही अंतरजिल्हा बदल्यांनी शिक्षक येणे तीन वर्षांपासून थांबलेले नाही. विशेष म्हणजे या विभागात वर्ग अ व ब ची ५७ पदे रिक्त आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिक्षकांना तात्पुरते समाधान; मन:स्ताप सुरुच

दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांत शिक्षक असलेली मंडळी अनेक वर्षे कुटूंबापासून दुर आहेत. आजारी पत्नी, आई - वडिल यांची काळजी घेण्यासाठी ही शिक्षक मंडळी अनेक प्रयत्न करुन नियमानुसार जिल्ह्यात येतात. अनेक वर्षांच्या खडतर सेवेतनंतर व प्रयत्नानंतर जिल्ह्यात बदलीचे समाधान शिक्षकांना वाटते. मात्र, इथे अगोदरच शिक्षक अतिरिक्त असल्याने त्यांना पदस्थापना मिळत नाही, वेतनाचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे पुन्हा कोर्ट कचेऱ्या आणि आंदोलने करावी लागतात. परिणामी हे समाधान औक घटकेचे ठरते. याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या कारभारातही होतो.

ठळक घटना

  • - रिक्त पदांनी जिल्हा परिषद पंगू
  • - अतिरिक्त असताना बाहेरुन शिक्षक येताहेतच
  • - क व ड संवर्गाची साडेआठशेंवर पदे रिक्त
  • - अ व ब ची संवर्गाची दिडशेंवर पदे रिक्त
  • - अनेक वेळा मागूनही पदे भरली जात नाहीत
  • - नको म्हणूनही अंतरजिल्हा बदल्या सुरुच
  • - अतिरिक्त झाल्याने शिक्षकही मानसिक ताणात

विभागनिहाय वर्ग अ व ब संवर्गाची रिक्त पदे

- वित्त विभाग
- गट अ : ०१

बांधकाम विभाग
- गट अ : ०२ 
- गट ब : ०४

पाणी पुरवठा
- गट अ : ०१
- गट ब : ०६ 

आरोग्य विभाग
- गट अ : १८
- गट ब : ०५

पशुसंवर्धन विभाग
गट अ : २९

शिक्षण विभाग 
- गट अ : ०२
- गट ब : ५५

समाजकल्याण विभाग
- गट अ : ०१
- गट ब : ०९ 

ग्रामीण विकास यंत्रणा

- गट अ : ०१
- गट ब : ०३

- गटविकास अधिकारी : ०४
- सहाय्यक गटविकास अधिकारी : ०४

(संपादन-प्रताप अवचार)