डॉक्टरांच्या मुलांची 'नीट'मध्ये बाजी; वेदिका, अमेयचे देदीप्यमान यश   

vedika.jpg
vedika.jpg

उस्मानाबाद : नीटच्या परीक्षेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांची कन्या वेदिका हिने ५९९ गुण तर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख यांचा मुलगा अमेय याने ६६५ गुण मिळवत गुणवत्ता सिद्ध केली. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणा सांभाळणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मुलांनी मिळविलेले हे यश कौतुकाचा विषय ठरत आहे.

अमेय देशमुख हा दहावीपर्यंत छत्रपती शिवाजी हायस्कुल येथे शिकत होता, तो अभ्यासाबरोबरच खेळातसुध्दा आघाडीवर राहिलेला आहे. त्याने व्हॉलीबॉल खेळात राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजविले होते. क्रिडाशिक्षक संजय देशमुख यांच्या तालमीत त्याने खेळाचा प्रारंभ केला होता. अभ्यासाबरोबरच खेळातसुध्दा प्राविण्य मिळविणाऱ्यांची संख्या नगण्य असते, मात्र अमेयने दोन्ही पातळीवर यश मिळविले आहे. दहावीमध्ये शंभर टक्के घेऊन त्याने पुढील शिक्षण लातुर येथील शाहु महाविदयालयात पुर्ण केले आहे. अकरावीला त्याने केंद्रीय बोर्डात प्रवेश घेऊन बारावीला तिथेही त्याने चांगले गुण मिळविले होते. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची मानल्या जाणाऱ्या या परिक्षेतही त्याने 665 एवढे गुण घेऊन एकप्रकारे आपला प्रवेश निश्चित केला आहे. अमेयचे आईवडील दोघेही डॉक्टर असुन आता अमेयसुध्दा त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. 

वेदीका पाटील ही दहावीपर्यंत येथील श्रीपतराव भोसले हायस्कुलमध्येच शिकत होती. तिला दहावीला शंभर टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर अकराविला लातुर येथील शाहु महाविदयालयात प्रवेश घेतला. अभ्यासाचे नियोजन करत नीटच्या परिक्षेत तिने 599 एवढे गुण मिळवुन आपला वैद्यकीय प्रवेश जवळपास निश्चित केल्याचे दिसुन येत आहे. तिचे वडील डॉ. धनंजय पाटील हे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणुन कार्यरत आहेत, तर आई रजनी पाटील यादेखील डॉक्टर असुन वैद्यकीय सेवेतच आहेत.वेदिकाचेही आई वडीलाप्रमाणे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते, ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com