बोंबला... शेतकरी कर्जाच्या चारशे कोटींची गटसचिवांकडून अफरातफर : मेटे

Beed News
Beed News

बीड : शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत घेतलेले कर्जाची परतफेड केल्यानंतर गटसचिवांनी या रकमा जिल्हा बँकेकडे वर्गच केल्या नाहीत. यातून चारशे कोटींवर अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला.

कर्जभरलेल्या आणि कर्जही न घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर जिल्हा बँक सरकारची कर्जमाफी घेत असल्याचा आरोपही श्री. मेटे यांनी केला.

अशी अफरातफर करणाऱ्या सेवा सोसायट्यांची जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा बँकेने चौकशी करुन अफरातफर करणाऱ्या गटसचिवांवर फौजदारी दाखल करावी, अटक करुन पैसे भरुन घ्यावेत, संघटतीत गुन्हेगारीचा हा प्रकार असून तशी कलमे लावावीत, अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

काही शेतकऱ्यांनी कर्ज भरले आणि काही शेतकऱ्यांनी कर्जच काढले नाही, त्यांच्याबाबत हा प्रकार घडला असून यात शेतकरी अनभिज्ञ असल्याचे विनायक मेटे म्हणाले. बोगस पिक कर्ज तयार करणारी टोळीच असल्याचा आरोपही त्यांनी केला. गटसचिवांच्या वेतनासाठी जिल्हा बँकेला भेटलेल्या कर्जमाफी रकमेतून दोन टक्के रक्कम देण्यालाही त्यांनी विरोध केला.

त्यांनी कर्जवसूलीऐवजी शेतकऱ्यांच्या रकमा घशात घातल्याने त्यांना रक्कम देणे चुक आहे. उलट त्यांना ही दोन टक्क्याने २५ कोटी रुपये रक्कम देण्यासाठी आग्रह धरणारे भाजप व राष्ट्रवादीचे नेतेही यात सामिल असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, लक्ष्मण ढवळे, अनिल घुमरे, नवनाथ प्रभाळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com