esakal | बीड : आत्महत्या केलेल्या विवेकची सुसाईड नोट बनावट; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

विवेक.jpg

नीटची परीक्षा दिल्यानंतर पेपर अवघड गेल्याने आत्महत्या केलेल्या विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल झालेली ती सुसाईड नोट बनावट असल्याचे  पोलिस तपासात समोर आले आहे.

बीड : आत्महत्या केलेल्या विवेकची सुसाईड नोट बनावट; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : नीटची परीक्षा दिल्यानंतर पेपर अवघड गेल्याने आत्महत्या केलेल्या विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल झालेली ती सुसाईड नोट बनावट असल्याचे समोर आले आहे. सुसाईड नोटमधील हस्ताक्षर त्याचे नसल्याने या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
तालुक्यातील केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने बुधवारी (ता. ३०) आत्महत्या केल्यानंतर ‘मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मला वैद्यकीय प्रवेश मिळणार नाही, माझ्या घरच्यांची खासगी महाविद्यालयात शिकवण्याची ऐपत नाही, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मराठ्यांची मुलांची किवा येईल आणि माझे मरण सार्थकी लागेल, अशा आशयाची चिठ्ठी सोशल मिडीयावर व्हायरल झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यानंतर लोकप्रतिनिधींसह विविध घटकांनी सरकारवर विवेक रहाडे हा राज्य सरकारच्या उदासिन धोरणाचा बळी असल्याच्या टिकेची झोड उठविली. मात्र, सदर चिठ्ठीतील अक्षर विवेक रहाडेचे नसल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या तपासणीत समोर आल्याने या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. फौजदार सुरेश माळी यांनी फिर्याद दिली. सोशल मिडीयावर सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कृत्य केल्याचे म्हटले आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)