Video : माझं बाळ पुन्हा जिवंत होईल का?

गजानन भोयर
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय परिसरातील शेतात गेल्या अनेक दिवसांपासून 30 ते 40 माकडाचा कळप येतोय.

वाशिम : वाशिममधील एका माकडाच्या पिल्लाचा अपघाती मृत्यू झाला आहे. मात्र, तब्बल दोन दिवस उलटूनही आपलं बाळ जिवंत होईल, या आशेने मृत झालेलं पिल्लू अजूनही सोबत घेऊन फिरत असल्याचे दृश्य समोर आले आहे.

- Vidhan Sabha 2019 : पाच वर्षे वाट पाहिली; आता त्यांनाच उमेदवारी- मुख्यमंत्री

वाशिम शहरातील राजस्थान कॉलेज परिसरात एका वानराच्या पिल्लाचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळं माझं पिल्लू जिवंत होईल, अशी आशा या वानर मादीला असल्याने त्या मृत पिल्लाला ती सोबत घेऊन फिरत असल्यानं तिच्यासोबत फिरणारी वानर सेना पाहून खऱ्या माणुसकीचे दर्शन घडत आहे.

वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय परिसरातील शेतात गेल्या अनेक दिवसांपासून 30 ते 40 माकडाचा कळप येतोय. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून एक मादी आपलं मेलेलं पिल्लू घेऊन फिरत आहे. शिवाय तिने खाणं-पिणंसुद्धा बंद केलं असल्याचं स्थानिक शेतकरी सांगत आहेत.

- महाराष्ट्रात 19 सप्टेंबरनंतर आचारसंहिता लागणार..!

एकीकडे माणसांमधील नात्यांचा ओलावा आटत चालल्याचे दिसून येत आहे. मात्र, वाशिममधील एका वाणराच्या पिल्लाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. तब्बल दोन दिवस उलटूनही आपलं बाळ जिवंत होईल, याच आशेने मादी वानर मेलेल्या पिल्लाचे शरीर सोबत घेऊन फिरत असल्याचे संवेदनशील आणि मन हेलावणारे दृश्य जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

दोन दिवसांपूर्वी एका गाडीची धडक बसल्याने या वानर मादीचे पिल्लू अपघातात मृत पावले. त्या दिवसापासून त्या मादीने काहीही खाल्ले नाहीय. तिच्याकडून हे पिल्लू हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तरी ती त्या पिल्लाला सोडायला तयार नाही.
- विशाल रावले, स्थानिक शेतकरी

- 'ओम' आणि 'गाय'मुळे अनेकांना धक्का : पंतप्रधान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will my baby come back to life