वडाची फांदी आणून घरीच पूजा 

अंकुशनगर : वडाची फांदी आणून घरीच पूजा करताना महिला. 
अंकुशनगर : वडाची फांदी आणून घरीच पूजा करताना महिला. 

अंकुशनगर (जि.जालना) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात यंदा अनेक महिलांनी घरीच वडाची फांदी आणून शुक्रवारी (ता.पाच) पूजा केली. तर काहींनी सकाळी लवकर ज्या ठिकाणी वड आहे त्या ठिकाणी जाऊन पूजन करून, प्रदक्षिणा घालून लगेच घर गाठले. 

ज्येष्‍ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.

सध्या कोरोनाचे सावट असल्याने कोणताही उत्सव, सण फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून व घरी राहून साजरे होत आहे. त्याचप्रमाणे महिलांचा महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमा हा सण साधेपणानेच साजरा झाला.

अनेकींनी घराजवळील, गर्दी नसलेल्या भागात, शेतात जाऊन वडाचे पूजन केले आहे. मास्क, रुमाल, स्कार्फचाही वापर केला. अनेक दिवसांपासून घरातच असणाऱ्या महिलांनी घराबाहेर पडल्यानंतर परस्परांची ओझरती भेट घेऊन विचारपूस केली. अनेक महिलांनी घराबाहेर जाणे टाळले. घरीच वडाची फांदी आणून मनोभावे पूजा केली. 

जालन्यात मास्क लावून अनेकींनी केली पूजा

जालना शहरात कोरोना विषाणूच्या सावटाखाली यंदाची वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. महिलांनी तोंडाला मास्‍क, रुमाल लावून वडाच्या झाडांची पूजा केली. जालना शहरासह जिल्ह्यात वटपौर्णिमेनिमित्त सकाळपासून महिला वटवृक्षाच्या पूजेसाठी सरसावल्याचे दिसून आले.  जास्त गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवत पूजा केली. अनेक ठिकाणी घरीच वडाच्या छोट्या रोपाचीही पूजा करण्यात आली. महिलांनी गर्दी नसलेल्या ठिकाणच्या वडाच्या पूजेला प्राधान्य दिले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com