esakal | महिला दिन : रेल्वेमधील महिला कर्मचाऱ्यांचे गौरवास्पद कार्य
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मधु राजेंद्र ह्या नांदेड रेल्वे स्थानकावर पोईंटस मन या पदावर महत्वाचे कार्य करत आहेत. श्रीमती पुष्पलता या आदिलाबाद रेल्वे स्थानकावर याच पदावर कार्य करत आहेत, श्रीमती भारतीसिंग या वाशीम येथील रेल्वे गेट क्र. ११४ वर गेटमन म्हणून महत्वाचे कार्य करत आहेत. तसेच श्रीमती लिना या शिवनी रेल्वेस्थानकावर कार्य करत आहेत

महिला दिन : रेल्वेमधील महिला कर्मचाऱ्यांचे गौरवास्पद कार्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड रेल्वे विभागात सुद्धा विविध महत्वाच्या पदावर महिला कर्मचारी गौरवास्पद कार्य करत करत आहेत. यामध्ये मधु राजेंद्र ह्या नांदेड रेल्वे स्थानकावर पोईंटस मन या पदावर महत्वाचे कार्य करत आहेत. श्रीमती पुष्पलता या आदिलाबाद रेल्वे स्थानकावर याच पदावर कार्य करत आहेत, श्रीमती भारतीसिंग या वाशीम येथील रेल्वे गेट क्र. ११४ वर गेटमन म्हणून महत्वाचे कार्य करत आहेत. तसेच श्रीमती लिना या शिवनी रेल्वेस्थानकावर कार्य करत आहेत.

आरती वटाणे ह्या आरपीएफमध्ये नांदेड रेल्वे विभागात ‘निर्भया पथक’मध्ये कार्य करत असून त्यांनी अनेक महत्वाच्या वेळी महिला प्रवाशांना मदत केली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय रेल्वेमध्ये ता. एक मार्च ते १० मार्च दरम्यान महिला गौरव मोहीम राबविली जात आहे.

काही ठळक घटना
 
ता. २९ जानेवारी रोजी ओखा- रामेश्वर एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या औरंगाबाद येथील महिला प्रवाशाला प्रसूती वेदना होत होत्या. श्रीमती आरती यांना ही माहिती कळताच त्यांनी गाडीमधील त्या महिला प्रवाशाला विचारणा करून आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नांदेड येथील जयश्री हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्या महिला प्रवाशाने एका कन्येस जन्म दिला. तिच्या कुटुंबाने श्रीमती आरती यांचे आभार मानले. 

हेही वाचा महिलांच्या सन्मानासाठी इथं पुरूष उतरणार रस्त्यावर
 
तेरा दिवसाच्या बाळासह महिलेचे प्राण वाचविले

ता. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी गोकुळनगर नांदेड येथील एक महिला कौटुंबिक भांडणामुळे नांदेड रेल्वे स्थानकावर येवून रेल्वेखाली आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांत होती. त्या महिलेचे हाव -भाव पाहून श्रीमती आरती यांना शंका आली. अधिक विचारणा केली असता खरी माहिती कळाली. श्रीमती आरती यांनी त्या महिलेची समजूत काढून तिच्या पतीला नांदेड रेल्वे स्थानकावर बोलावून घेतले आणि त्या महिलेला आत्महत्यासारखे वाईट कार्य करण्यापासून परावृत्त केले. महत्वाचे म्हणजे त्या महिलेस १३ दिवसाचे मुल होते. 

येथे क्लिक कराVideo : पाहा...कठाळ्यांच्या झुंजीने परभणीत काय झाले

दोन महिला चोराना अटक
 
ता. दोन आॅक्टोबर २०१९ रोजी नागपूर येथील दोन महिला चोर नांदेड रेल्वे स्थानकावर संशयास्पद स्थितीत फिरत होत्या. त्यांच्यावर लक्ष ठेवून जेंव्हा त्यांनी एका प्रवाशाचा मोबाईल फोन चोरला तेंव्हा श्रीमती आरती यांनी त्या महिलांना पकडले. तेंव्हाच या दोन्ही महिला चोरांनी गाडी संख्या १७६१४ पनवेल एक्सप्रेसमधील एस-३ डब्यात शिरल्या आणि पळून जातांना त्यांच्या जवळ असलेला चोरीचा माल ज्यात दोन मंगळसूत्र आणि चार हजार रुपये होते. ते प्लॉटफार्मवर फेकले. या बद्दल श्रीमती आरती वटाणे यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक हे शुक्रवारी (ता. सहा) मार्च रोजी पुरस्कार देवून सन्मान करणार आहेत.
 

loading image