esakal | चाकूर तालूक्यातील ३५ ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज!  
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत.jpg

तालूक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरूवारी (ता.१९) दुपारी काढण्यात आले. यात १४ जागा अनुसुचित जाती, १९ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग व ३६ जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्या असून यातील ३५ गावात महिलांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे, तर नळेगाव, जानवळ ही मोठी गावे खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यामुळे या गावातील निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. 

चाकूर तालूक्यातील ३५ ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज!  

sakal_logo
By
प्रशांत शेटे

चाकूर (लातूर) : तालूक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरूवारी (ता.१९) दुपारी काढण्यात आले. यात १४ जागा अनुसुचित जाती, १९ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग व ३६ जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्या असून यातील ३५ गावात महिलांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे, तर नळेगाव, जानवळ ही मोठी गावे खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यामुळे या गावातील निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

येथील यशवंत मगंल कार्यालयात प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, नायब तहसीलदार बालाजी चितळे उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खुल्या प्रवर्गासाठी आनंदवाडी, अजनसोंडा (बु), आष्टा, आटोळा, बेलगाव, बोथी, देवंग्रा, डोंग्रज, हिंपळनेर, जानवळ, जढाळा, लिंबाळवाडी, मष्णेरवाडी, मोहदळ, नागदरवाडी, नळेगाव, वाघोली, झरी (खु), खुला प्रवर्ग महिला भाटसांगवी, ब्रम्हवाडी (ए), घारोळा, हाडोळी, हाळी (खु), जगळपूर, कबनसांगवी, कडमुळी, कवठाळी, महाळंग्रावाडी, नागेशवाडी, नायगाव, नांदगाव, राचन्नावाडी, रायवाडी, टाकळगाव, तिवघाळ, झरी (बु), अनुसुचित जाती लातूररोड, महांडोळ, महाळंग्रा, महाळंगी, रोहीणा, शिवणी मंजरा, वडवळ नागनाथ, अनुसुचित जाती महिला - अजनसोंडा (खु), बनसावरगाव, बोळेगाव, घरणी, मोहनाळ, शिवणखेड, सुगाव, नागरिकांच्या मागास प्रवर्ग-बावलगाव, बोरगाव, ब्रम्हवाडी (व), चापोली, गांजूर, कलकोटी, मुरंबी, रामवाडी, शिरनाळ, तिर्थवाडी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-अलगरवाडी, अंबुलगा, दापक्याळ, गांजूरवाडी, केंद्रेवाडी, मांडरूकी, शेळगाव, तिवटघाळ, उजळंब, अनुसुचित जमाती हणमंत जवळगा, अनुसुचित जमाती महिला वडगाव एक्की ही गावे आरक्षीत झाली आहेत. आरक्षण सोडतीसाठी नायब तहसीलदार शेषेरावे टिप्परसे, प्रकाश धुमाळ, विस्तार अधिकारी एकनाथ बुआ, महेश राठोड, अंगद कासले यांनी सहकार्य केले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(edited by pratap awachar)