
ता. 28 सप्टेबर 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील डॉ. विवेक सहस्त्रबुध्दे यांच्या अध्यक्षतेखाली गठित त्रिसदस्यीय समितीने परभणीच्या जिल्हा रुग्णालयास भेट दिली.
परभणी ः होय.. हे खर आहे. परभणीचे जिल्हा रुग्णालय व येथील लोकसंख्या विचारात घेता आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निकषात तंतोतंत बसतो आहोत, हे एव्हना सर्वांनाच माहिती झाले आहे. परंतू तपासणीसाठी आलेल्या डॉ. सहस्त्रबुध्दे यांच्या समितीने त्यांच्या अहवालात काय नमुद केले आहे. हा सर्वांसाठी औच्छुक्याचा विषय ठरत आहे. तर आज आम्ही या अहवालात दडलय काय ? याचा खुलासा करणार आहोत.
ता. 28 सप्टेबर 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील डॉ. विवेक सहस्त्रबुध्दे यांच्या अध्यक्षतेखाली गठित त्रिसदस्यीय समितीने परभणीच्या जिल्हा रुग्णालयास भेट दिली. या समितीमध्ये डॉ. संजय मोरे व डॉ. पी.टी.जमदाडे यांचा सहभाग होता. या समितीने परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अपघात विभाग, रक्तपेढी, प्रसुतीशास्त्र विभाग कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, प्रशासकीय इमारत, धोबी घाट कार्यशाळा आदी महत्वाच्या ठिकाणी पहाणी केली. त्यानंतर समितीने ब्राम्हणगाव, ब्रम्हपुरी, सायाळा व परभणी शहरातील उड्डाणपुला शेजारील जागेची पाहणी केली. याचा अहवाल समितीने ता. 29 सप्टेंबर 2018 रोजी शासनास सादर केला. समितीने एकूण 16 मुद्याचा अहवाल शासनाकडे सादर करतांना 15 मुद्द्यामध्ये येथील अनुकुल परिस्थिती दर्शविली होती. परंतू 16 व्या मुद्द्याचे परत तीन भाग करून त्यात परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा स्पष्ट व सकारात्मक अहवाल दिला होता.
हेही वाचा - चांगली बातमी : कुटीरोद्योगाच्या माध्यमातून शिवणी येथील बचत गटांच्या महिलांना रोजगार -
सोळाव्या मुद्द्यात सुयोग्य, शक्य व आवश्यक हे शब्द
डॉ. सहस्त्रबुध्दे समितीने भारतीय आयुर्विज्ञान परिषद नवी दिल्ली यांच्या मानकाप्रमाणे स्वंयस्पष्ट अहवाल सादर केला.
1. जिल्हा सामान्य रुग्णालयातील खाटांची संख्या व रुग्णालयाची इमारत पाहता नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दुष्टीने सुयोग्य आहे.
2. सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये किरकोळ बदल केल्यास एम.बी.बी.एसचे तीन विषय शरीरशास्त्र, जीवरसायनशास्त्र व शरिरक्रियाशास्त्र यांचे शैक्षणिक कार्य सुरु करणे शक्य आहे.
3.परभणीत 100 विद्यार्थांचे महाविद्यालय सुरु करता येऊ शकते. त्यासाठी पदनिर्मिती करणे गरजेचे आहे. ब्रम्हपुरी (ता.परभणी) येथील 14.88 हेक्टर आर जागा व परभणी शहरालगतची जागेमध्ये टप्याटप्याने बांधकाम करणे शक्य आहे. त्यासाठी ही जागा हस्तांतरी होणे गरजेचे आहे.
आता लोकांचा पुढाकार महत्वाचा...!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी परभणीकर संघर्ष समितीने जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद ही मिळाला. परंतू आता या मागणीला अधिक वेगाने पुढे रेटण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या रेट्याची गरज भासणार आहे. तो पुढाकार महत्वाचा ठरणार आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे