esakal | अंबाजोगाईत योगेश्वरी मंदिर फुलांनी सजले, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

yogeshwari anbajogai.jpg

देवीचे दर्शन घेऊन भाविकांनी फोटो काढले आणि हा आनंद भाविकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.

अंबाजोगाईत योगेश्वरी मंदिर फुलांनी सजले, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (बीड) : तब्बल आठ महिन्यानंतर भाविकांसाठी सोमवारी (ता.१६) खुले झालेले योगेश्वरी मंदिर फुलांच्या माळांनी सजविण्यात आले. साफ, सफाई करून परिसराची स्वच्छताही करण्यात आली. या दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिर खुले होताच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले योगेश्वरी मंदिर सोमवारी खुले होताच, देवीच्या दर्शनाची ओढ लागलेल्या भाविकांनी सकाळीच दर्शनासाठी गर्दी केली होती. परंतू शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे स्वच्छता करून मंदिर खुले करण्यात आले. भाविकांना मास्क असल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. रांगेतील दोन भाविकात अंतर ठेऊन दर्शनास पाठवले जात होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फोटो काढण्याचा आनंद

अनेकांनी देवीचे दर्शन घेऊन, योगेश्वरी देवीचा फोटो काढण्याचा आनंदही अनेकांनी घेतला. काही भाविक मी देवीचे दर्शन घेतले, त्यासोबतचे फोटो काढुन सोशल मिडीयावर टाकण्यासही विसरले नाहीत. मंदिरे उघडल्याचा इतका आनंद भाविकांना झाला होता. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

व्यावसायिकांना आनंद

भाविकांबरोबरच देवीच्या परिसरात पुजा साहित्याचा व्यवसाय करणारांनाही आता आपलाही व्यवसाय सुरू झाल्याचा आनंद झाला होता. कोरोनामुळे मागील आठ महिने यांचे हे व्यवसाय बंद असल्याने, रोजगाराचा प्रश्न या दुकानदारांवर निर्माण झाला होता. मंदिर खुले होताच भाविकांची रीघ वाढल्याने, या दुकानदारांचे पुजा साहित्य विक्रीही सुरू झाली. पुरोहितांचाही पुजापाठ सुरू झाला.

(संपादन-प्रताप अवचार)