प्रेमीयुगलाने घेतला गळफास, दोर तुटला अन् युवकाचा गेला जीव

साथ मरेंगे या इराद्याने घरातील आडुला या प्रेमीयुगलाने गळफास घेतला.
Beed Suicide News
Beed Suicide Newsesakal

जातेगाव (जि.बीड) : तीस वर्षीय विवाहीत महिलेसोबत फेसबुकवरुन प्रेम जुळवून आलेल्या सत्तावीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भेंड बुद्रुक (ता.गेवराई) येथे सोमवार (ता.१७) पहाटे घडली. जयपाल लक्ष्मण वाव्हळ (वय २७, रा.भेंड बुद्रुक, ता.गेवराई) (Gevrai) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाचे कल्याण येथील तीस वर्षीय विवाहित महिलेसोबत फेसबुकवरुन प्रेम जुळवून आले. दोन दिवसांपूर्वीच ही विवाहीत महिला भेंड बुद्रुक येथे आली. (Young Committed Suicide In Gevrai Taluka Of Beed)

Beed Suicide News
भाजप आक्रमक, परभणीत खासदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन

रविवारी (ता.१६) सदरील महिलेला पतीने फोन करून गुन्हा दाखल करील असे या विवाहीत महिलेस बजावले असता भीतीपोटी साथ मरेंगे या इराद्याने रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवारी (ता १७) पहाटे घरातील आडुला या प्रेमी युगलाने गळफास घेतला असता विवाहीत महिलेचा दोर तुटला. मात्र, जयपाल वाव्हळ याचा (Beed Crime News) यामध्ये मृत्यू झाला. या बाबत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून एम.डी.कुवारे पुढील तपास करित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com