esakal | गोदावरी पात्रात युवकाचा बुडून मृत्यू, बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथील घटना!   
sakal

बोलून बातमी शोधा

beed.jpg

राक्षसभुवन येथील अविनाश नाटकर हा शनिवारी (ता.7) सकाळी येथील गोदावरी नदीच्या पात्रात आपल्या मित्रांना घेऊन अंघोळीसाठी गेला. गोदा पात्रातील पाण्यात उडी मारल्यानंतर खूप वेळानंतरही पाण्याच्या वरती तो आलाच नाही. त्यामुळे सोबत असलेल्या मित्रांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली.

गोदावरी पात्रात युवकाचा बुडून मृत्यू, बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथील घटना!   

sakal_logo
By
वैजीनाथ जाधव

गेवराई (बीड) : गोदापात्रात अंघोळीसाठी गेलेल्या एका अठरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता. सात) सकाळी आठच्या सुमारास तालूक्यातील राक्षसभुवन येथे घडली. अविनाश जगदीश नाटकर (वय 18) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मिळालेल्या माहितीनुसार, राक्षसभुवन येथील अविनाश नाटकर हा शनिवारी (ता.7) सकाळी येथील गोदावरी नदीच्या पात्रात आपल्या मित्रांना घेऊन अंघोळीसाठी गेला. गोदा पात्रातील पाण्यात उडी मारल्यानंतर खूप वेळानंतरही पाण्याच्या वरती तो आलाच नाही. त्यामुळे सोबत असलेल्या मित्रांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. तत्काळ गावकरी घटनास्थळी आले. युवकाची शोधाशोध केली. त्याचा शोध गावांतील नागरिकांना लागत नसल्याने सदरील घटनेची माहिती प्रशासनाला कळवली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती मिळताच घटनास्थळी तहसीलदार सचिन खाडे, तलाठी वाकुडे, मंडळाधिकारी यांच्यासह चकलांबा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झिंजूर्डे व पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने नदीपात्रात शोधाशोध केली. सहा तासाच्या अथक शोधमोहिमेनंतर अविनाशचा मृतदेह पाण्यातून काढण्यात आला. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी उमापूर येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी चार वाजेनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपुर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काकाने केला होता विरोध  
सकाळी अविनाशच्या काकाने अविनाशला नदीवर अंघोळीसाठी जाऊ नकोस म्हणून विरोध केला. घरीच अंघोळ कर असा आग्रह केला होता. पण अविनाशला त्यांचा सल्ला आवडला नाही. व मित्रांसमवेत तो नदीवर पोहण्यासाठी गेला.

(संपादन-प्रताप अवचार)