परभणीत पैशाच्या देवाण-घेवाणीवरून युवकाचा खून, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल | Parbhani Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

परभणीत पैशाच्या देवाण-घेवाणीवरून युवकाचा खून, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गंगाखेड (जि.परभणी) : पालम तालुक्यातील रावराजुर येथील रहिवासी विकास अडकिणे याचा रोकडेवाडी येथील उत्तम देवकते यांच्यासोबत ऊसतोडणीसाठी दिलेल्या पैशाच्या देवाण-घेवाण वरून वाद झाल्याने विकास अडकिणे याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.२७) सकाळी उघडकीस आली. गंगाखेड (Gangakhed) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व पालम तालुक्यातील रावराजुर येथील रहिवासी तुळशीराम अडकिणे, विकास अडकिणे, नरेश अडकिणे यांनी रोकडेवाडी येथील उत्तम देवकते यांच्याबरोबर कर्नाटक राज्यातील खानापूर येथील लैला शुगर कारखाना येथे ऊसतोडणीसाठी लागणार्‍या टोळीपोटी ७,५०००० रुपये उत्तम देवकते यांना दिले. (Youth Killed For Money, Case Filed Against 6 People In Gangakhed Taluka Of Parbhani)

हेही वाचा: मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा - पंकजा मुंडे

अडकिणे यांनी एक महिना ट्रॅक्टरसह कर्नाटक येथील कारखान्यावर काम केले. पैशाच्या देवाण-घेवाणी वरून त्यांनी काम सोडून रावराजुर येथे वापस आल्यानंतर अडकिणे यांनी देवकते यांना पैशाचा हिशोब करून उर्वरित रक्कम मला वापस द्या असा तगादा लावला. परंतु देवकते यांनी पैसे वापस देणार नाही. पैसे मागितले तर जीव मारण्याची धमकी दिली. परंतु विकास अडकिणे यांनी सदरील पैसे वापस मागितल्याचा मनात राग धरून रावराजुर - सायाळा रस्त्यावरील टावर जवळ गुरुवारी (ता.२६) रात्री आठ वाजेच्या दरम्यान विकास अडकिणे व वशिष्ठ नवघरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून विकास अडकिणे यांचे अपहरण करत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करून पुन्हा रावराजुर - सायाळा रस्त्यावरील टावर जवळ आणून शेतात फेकले. (Parbhani)

हेही वाचा: बंधाऱ्यात बुडून ३ मुलांचा मृत्यू, लग्नाच्या दिवशी कुंटूबावर दुःखाचा डोंगर

त्यानंतर शुक्रवारी (ता.२७) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घरच्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता विकास अडकिणे याचा मृतदेह आढळून आल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात वशिष्ठ नवघरे यांच्या फिर्यादीवरून दशरथ देवकते, राजू देवकते, उत्तम देवकते, गाडी चालक व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील माने हे करित आहेत.

Web Title: Youth Killed For Money Case Filed Against 6 People In Gangakhed Taluka Of Parbhani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top