गावच्या पोराचा नादच खुळा! बनवले भन्नाट यंत्र, दुचाकी हेल्मेटशिवाय होणार नाही सुरु

विवेक पोतदार
Wednesday, 27 January 2021

असाच एक ध्येयवेडा तरुण राजीव बळीराम केंद्रे हा गुत्ती (ता.जळकोट) या गावात राहून नवे प्रयोग करतो.

जळकोट (जि.लातूर) : काही जण तरुणाईच्या वयात भरकटतात, तर काहीजण वेगवेगळ्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करत लक्ष वेधून घेतात. असाच एक ध्येयवेडा तरुण राजीव बळीराम केंद्रे हा गुत्ती (ता.जळकोट) या गावात राहून नवे प्रयोग करतो. त्याने अलीकडे असे एक सेन्साॅर बसवून यंत्र बनवत दुचाकी हेल्मेटशिवाय चालूच होणार नाही. असा नवा प्रयोग यशस्वी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

औरंगाबादच्या बेगम यांची तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका; नातेवाईकांनी मानले पोलिसांचे आभार

गावात इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करण्याचा छोटा व्यवसाय असलेल्या या तरुणाने टाकाऊ वस्तूपासून एक यंत्र तयार करुन हेल्मेटला बसवले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे दूचाकीला हेल्मेट दाखविल्याशिवाय बाईक चालू होणार नाही. हेल्मेट बाईकला हे यंत्र बसविल्यामुळे हे यंत्र दुचाकीच्या चावीचे काम करत आहे. बाईक चालू करणे व बंद करणे हे दोन्ही कार्य या हेल्मेटनेच होते. असा दावा करुन राजीवने हे सिद्ध करुन दाखवले आहे. या आगळा-वेगळ्या प्रयोगामुळे या युवकाचे कौतुक होत आहे.

Corona Update : कोरोनाबाधित रुग्णसंख्या पोचली ४६ हजाराच्या पुढे, ११५ जणांवर उपचार सुरु

राजीव केंद्रे यांनी टाकाऊ टीव्हीचा सेटअपबाॅक्स वापरातून फेकून दिलेले केबल, एक ट्रान्समीटर आणि एक रिसीव्हर बसवले आहे. हेल्मेटमध्ये ट्रान्समीटर आणि आणि बाईकमध्ये रिसिव्हर बसविले आहे. जेव्हा आपण हेल्मेट बाईकच्या जवळ घेऊन जातो तेव्हा रिसिव्हरला ऑन अर्थात चालूचे सिग्नल मिळताच बाईक चालू होते. बाईक चालू होताच रिसिव्हरमधून बाईकचे माॅडल कोणते आहे. दुचाकीचे नाव, टायरची स्थिती, टायर अशी सर्व माहिती या यंत्राद्वारे सांगितली जाते. जेव्हा बाईक बंद करायची असते तेव्हा पुन्हा हेल्मेट रिसिव्हरजवळ धरले की बाईक बंद होते. अशी व्यवस्था या यंत्रात केली आहे. तसेच या यंत्रामध्ये सेन्साॅर आणि मायक्रोप्रोसेसर बसवल्यामुळे बाईकची स्थिती आपल्याला या यंत्राव्दारे समजू शकते. असेही त्याचे म्हणणे आहे. 

Success Story: ३० गुंठ्यात १० टन टरबूजाचे उत्पादन; देवळ्याच्या टरबूजांची दुबईला निर्यात

सध्या रस्ते  अपघातात हजारो व्यक्तींचा जीव जात आहे. शासन प्रत्येकांनी दुचाकीवर हेल्मेटच्या वापराची सक्ती करुनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. गाडी खरेदी करताना हेल्मेटची सक्ती असली तरी हेल्मेट वापरत नाहीत. यामुळे अपघातात जीव गमवावा लागतो. बाईक चालू करताना हेल्मेटचा वापर होत असल्याने हे यंत्र अनिवार्य केल्यास अपघातात जीव वाचणार आहे.  अपघातात दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागू नये. यासाठी हे कमी किंमतीत यंत्र बनविले आहे. या यंत्रासाठी केवळ एक हजार रुपयापर्यंत खर्च येतो असे राजीव केंद्रे यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

लहानपणापासून छंद

राजीव केंद्रे यांना लहानपणापासून काहींना काही नवीन बनविण्याचा छंद आहे. अगदी सात वर्षांचा असताना वेगवेगळे साहित्य वापरून पिठाची गिरणी बनविली होती. त्यानंतर त्याने मोबाईलद्वारे विद्युतपंप बंद- चालू करणारे यंत्र बनविले. त्या नंतर मागील वर्षी वायरलेस विद्युत बल्ब चालू बंद करणारे यंत्र बनविले होते. आता त्यांने हेल्मेटद्वारे दुचाकी चालू किंवा बंद करणारे यंत्र बनविले. त्याला नव संशोधनाची आवड आहे. 

 

मी माझ्या स्वत:च्या बाईकला हे यंत्र बसवले आहे. हेल्मेट नसल्याने अनेकदा अपघातात दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. त्यासाठी माझे यंत्र हेल्मेट व दूचाकी कंपनीने बसविले तर हेल्मेटविना जाणारे जीव निश्चित वाचतील. यासाठी या दोन्ही कंपनीने माझे तंत्रज्ञान घ्यावे. 
- राजीव केंद्रे, यंत्र संशोधक

 

आर्थिक पाठबळ आवश्यक
राजीव केंद्रे यांची आर्थिक परिस्थिती हलाखाची असून राजीवकडे नवे यंत्र बनवण्याचे कौशल्य आहे. यापूर्वीही त्याने असे यंत्र तयार केले आहेत. पण पैसा नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधी, शासन, सेवाभावी संस्थेनी याला मदत करुन प्रेरणा देण्याची गरज आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Makes Machine Where Without Helmate Two Wheelers Not Starts Latur News