बीड : क्वारंटाईन कक्षात तरुणाची आत्महत्या; तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू 

दत्ता देशमुख
Sunday, 12 July 2020

बीड  जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत चालला असून मागील ४८ तासात बीड जिल्ह्यातील तीन कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर गेवराई येथील क्वारंटाईन कक्षात संशयित असलेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याने भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. 

बीड : क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या आणि स्वब घेतलेल्या ३५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गेवराई येथे घडली. तुकाराम जगन्नाथ जाधव (वय ३५, रा बाबूलतारा तांडा, ता गेवराई) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

कोरोनाची काही लक्षणे असल्याने त्याला शुक्रवारी (ता.९) गेवराई पालिकेच्या शासकीय क्वारंटाईन सेंटर मध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्याचा स्वब घेतला. त्याचा अहवाल येण्याअगोदर या तरुणाने खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर डॉ. मुकेश कुचेरीया यांनी पाहणी करून पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे पथकासह दाखल झाले. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या एकुण रुग्णांचा दोनशेपार गेला आहे.  तर उपचार सुरु असलेल्या रुग्णांचा आकडा देखील शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यातच मागच्या ४८ तासात ३ कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. पाटोदा तालुक्यातील येवलवाडी व बेनसुर या गावातील प्रत्येकी एक पुणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गेवराई तालुक्यातील उमापुरच्या रुग्णाचा बीडच्या जिल्हा रुग्णालयात बळी गेला. या विविध आजार होते. अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

दरम्यान चकलांबा येथील एका तरुणाला क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी उशीरा त्याने कोरोनाच्या भितीने क्वारंटाईन सेंटरमध्ये आत्महत्या केली. यापूर्वी बीड तालुक्यात एका तरुणाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth suicide in quarantine room Three corona deaths in 48 hours