वरुणराजाच्या सरींत नवी मुंबईत बाप्पाचे आगमन; पावसामुळे गणेशभक्तांची गैरसोय

शरद वागदरे
Friday, 21 August 2020

नवी मुंबईत चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्‍यातच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वाट काढत वरुणराजाचा आनंद घेत भक्तांना बाप्पाला घरी आणावे लागत आहे. दुसरीकडे खरेदीसाठी बाहेर निघणाऱ्या गणेशभक्तांनाही संततधारेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पावसातच बाजारात खरेदीसाठी जावे लागत आहे. त्‍यामुळे नागरिक आवश्‍यक सामानांचीच खरेदी करत असल्याने व्यापारी नाराज झाले आहेत. 

वाशी : नवी मुंबईत चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्‍यातच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वाट काढत वरुणराजाचा आनंद घेत भक्तांना बाप्पाला घरी आणावे लागत आहे. दुसरीकडे खरेदीसाठी बाहेर निघणाऱ्या गणेशभक्तांनाही संततधारेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पावसातच बाजारात खरेदीसाठी जावे लागत आहे. त्‍यामुळे नागरिक आवश्‍यक सामानांचीच खरेदी करत असल्याने व्यापारी नाराज झाले आहेत. 

अधिक वाचा : सुशांतचा मृतदेह पाहून रिया म्हणाली, 'सॉरी बाबू'

महत्त्वाची बातमी : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून थेट मुंबई पोलिसांची चौकशी?

वरुणराजाने गणरायाचे स्वागत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यात भक्तांची तारांबळ उडताना शुक्रवारी सर्वत्र पाहायला मिळाली. चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता. अनेक ठिकाणी पाणीही साचले होते. त्यातच शनिवारी बाप्पांचे आगमन होणार असल्यामुळे गणेशभक्तांना खरेदीसाठी बाजारात जायचे होते. मात्र, वरुणराजाने लावलेल्या हजेरीमुळे गणेशभक्तांचा हिरमोड झाला. ग्राहकांनी खरेदीसाठी पाठ फिरवल्याने व्यापारीही नाराज झाले होते. तर दुसरीकडे गणरायाच्या स्वागताला खड्डेही मागे राहिले नाही. त्याचा वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. गणेशोत्सवाच्या तोडांवर पालिकेकडून केविलवाणा प्रयत्न करत बुजवलेले खड्ड्यांचे उखळ पांढरे पडल्याचे दिसून येत आहे. 

मोठी बातमी : मुंबईत सातमजली इमारतीला लागली आग; अनेक जण अडकल्याची भीती

पावसामुळे दिव्यांचा लपंडाव 
पावसामुळे ठाणे-बेलापूर मार्गासह ऐरोली नॉलेज पार्क रस्त्यांवरील पथदिव्यांचाही लपंडाव सुरू झाला आहे. दिवसाढवळ्या चालकांना वाहनांच्या हेडलाईटसवर वाहने चालवावी लागली. विष्णुनगर भागातील झोपडपट्टीमध्ये बत्तीगुल होण्याचे प्रकारही घडले. गुरुवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 25.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर बेलापूर 31.80 मिमी, नेरूळ 22.30 मिमी, वाशी 21 मिमी, कोपरखैरणे 30.80 मिमी, ऐरोली 23.60 मिमी पावसांची नोंद झाली आहे. 

हेही वाचा : ... म्हणून नागोठणे शहराला मिळणार दिलासा

पावसामुळे खरेदीसाठी येणे अवघड होते; मात्र गणेशोत्सवामुळे आलो आहे. जेवढे महत्त्वाचे सामान आहे, तेवढेच घेऊन जाणार आहे. उर्वरित सामान पाऊस गेल्यानंतर खरेदी करणार. 
- अरुण साळुंखे, ग्राहक 

कोरोनामुळे आधीच नुकसान झालेले आहे. त्यातच गणेशोत्सवामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे ग्राहकही अतिआवश्‍यकता असलेलेच सामान खरेदी करत आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच आता पावसाचाही परिणाम झालेला आहे. 
- सुरेश कुमार जैन, व्यापारी 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbaikars are chargrin due to rain during this Ganesh festival