खालापूर-खोपोलीतील बांधकाम व्यवसायाने पकडला वेग; थांबलेल्या कामांना सुरुवात

अनिल पाटील
Tuesday, 1 September 2020

बांधकाम व्यवसायात आर्थिक मंदी सुरू असतानाच कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. यात अन्य व्यवसायांबरोबर बांधकाम व्यवसायही बंद पडला. या दरम्यान रोजगार नसल्याने या क्षेत्रातील मोठ्या संख्येने मजूर व कामगारांनी आपापल्या मूळ गावी पलायन केले. सरकारची परवानगी मिळूनही हा व्यवसाय मंदावलेलाच होता; मात्र कामगार पुन्हा परतत असल्याने ऑगस्ट महिन्यापासून हा व्यवसाय पुन्हा रुळावर येत आहे. 

खोपोली : बांधकाम व्यवसायात आर्थिक मंदी सुरू असतानाच कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. यात अन्य व्यवसायांबरोबर बांधकाम व्यवसायही बंद पडला. या दरम्यान रोजगार नसल्याने या क्षेत्रातील मोठ्या संख्येने मजूर व कामगारांनी आपापल्या मूळ गावी पलायन केले. सरकारची परवानगी मिळूनही हा व्यवसाय मंदावलेलाच होता; मात्र कामगार पुन्हा परतत असल्याने ऑगस्ट महिन्यापासून हा व्यवसाय पुन्हा रुळावर येत आहे. 

खोपोली-खालापूर परिसरात रियल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आले होते. रायगड जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक तेजीत असलेला भाग म्हणून खोपोली-खालापूर परिसराकडे गुंतवणूकदार व विकासकांचे लक्ष होते. परंतु, जीएसटी व नोटबंदीच्या निर्णयानंतर या क्षेत्रातही मंदीचे वारे आले. हे क्षेत्र 2020 या वर्षांत यातून बाहेर पडत असतानाच कोरोनाचे नवे संकट आले. त्यात लॉकडाऊनमुळे अन्य क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रावर मोठा परिणाम झाला.

हेही वाचा : नागपूरमध्येही धारावी पॅटर्न? आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मायक्रोप्‍लॅनिंग!

शासकीय बंदी आणि लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता न होणे, मजुरांचे पलायन अशा अनेक कारणांनी बांधकाम व्यवसाय जवळजवळ ठप्प पडला होता. यामुळे यातील व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि यावर आधारित अन्य व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले होते. 

दुर्दैवी घटना : गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्‍पच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

सरकारकडून मिळालेली परवानगी आणि मजूर व कुशल कामगार परतल्याने ऑगस्ट महिन्यापासून हे क्षेत्र हळूहळू वेग धरत आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडूनही लाभदायक योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये करण्यात आलेली कपात ही महत्त्वाची ठरत आहे. या सर्वांचा एकंदरीत परिणाम म्हणून वर्तमानकाळात येथील बांधकाम व रियल इस्टेट क्षेत्र पुन्हा उभारी धरत असल्याचे दिसत आहे. 

महत्त्वाची बातमी : आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; विद्याथ्‍यार्ंना 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश!

रोजगाराचे केंद्र 
येथील बांधकाम व रियल इस्टेट क्षेत्र रोजगाराचे मुख्य केंद्र बनले आहे. 20 ते 22 हजार मजूर व कामगार, एक हजारपेक्षा अधिक कुशल व तांत्रिक कामगारांचा यात थेट समावेश आहे. विविध पूरक व्यवसायाच्या माध्यमातूनही शेकडो लहान मोठे व्यापारी व रोजगार अवलंबून आहेत. 

अनेक प्रकल्पांचा श्री गणेशा
लॉकडाऊनमुळे खोपोली-खालापूर परिसरातील 150 च्यावर मोठे आणि 200 हून अधिक लहान प्रोजेक्‍ट बंद पडले होते. नवीन प्रोजेक्‍ट सुरू करण्याची हिंमत कोणीच करत नसल्याची स्थिती आहे. परंतु, ऑगस्ट महिन्यापासून यातील बहुतांश प्रोजेक्‍टने पुन्हा श्री गणेशा करून जोमाने कामे सुरू केली आहेत. 

अधिक वाचा : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा; विद्याथ्‍यार्ंची घरातूनच परीक्षा? : परीक्षेचा निर्णय उद्या

लॉकडाऊनमुळे बांधकाम व रियल इस्टेट व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला आहे. यातून बाहेर येण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कमधील कपातीचा लाभ होईल, असे वाटत असून हळूहळू कामे सुरू होत आहेत. हे क्षेत्र गतिमान होण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून तांत्रिक व आर्थिकस्तरावर पूरक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. 
- अतिक खोत, संचालक, आशियाना ड्रीम होम, खोपोली 

(संपादन : उमा शिंदे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Real Estate and Constuctions has started again in Khalapur-khopoli