esakal | 'या' रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांची खड्ड्यांतून मुक्तता; रस्ता झाला चकाचक
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल रेल्वेस्थानकाकडील रस्ता चकाचक झाला आहे.

रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी मागील अनेक वर्षे खड्ड्यातून कराव्या लागणाऱ्या प्रवासातून पनवेलकरांची अखेर सुटका झाली आहे. महामार्ग क्रमांक 4 ते पनवेल रेल्वेस्थानकापर्यंत पालिकेमार्फत तयार केलेल्या कॉंक्रीट रस्त्याचे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे. अनेक अडचणींचा सामना करत कोरोना काळातही रस्त्याचे काम पूर्णत्वास नेणाऱ्या झेनिथ कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या कामाचे यानिमित्त कौतुक केले जात आहे. 

'या' रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांची खड्ड्यांतून मुक्तता; रस्ता झाला चकाचक

sakal_logo
By
दीपक घरत

पनवेल : रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी मागील अनेक वर्षे खड्ड्यातून कराव्या लागणाऱ्या प्रवासातून पनवेलकरांची अखेर सुटका झाली आहे. महामार्ग क्रमांक 4 ते पनवेल रेल्वेस्थानकापर्यंत पालिकेमार्फत तयार केलेल्या कॉंक्रीट रस्त्याचे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे. अनेक अडचणींचा सामना करत कोरोना काळातही रस्त्याचे काम पूर्णत्वास नेणाऱ्या झेनिथ कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या कामाचे यानिमित्त कौतुक केले जात आहे. 

मोठी बातमी : मुंबईनजीकच्या बेटांवर आता थेट गाडीने जाता येणार; महापालिकेने घेतला पुढाकार

महामार्ग क्रमांक 4 च्या रुंदीकरण कामादरम्यान येथील वाहतूक वळवल्याने महामार्ग ते रेल्वेस्थानकापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. नगरपालिका अस्तित्वात असल्यापासून वापरात असलेल्या या रस्त्याची दुरुस्ती कोणी करायची? या वादात सापडल्यानंतर पालिका प्रशासनाने पुढाकार घेत मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेतला. यात 600 मीटर लांब व 18 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी 4.66 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या भागाचा कायापालट झाला आहे. 2019 मध्ये सुरू केलेले हे काम 95 टक्के पूर्ण झाल्याची माहिती झेनिथ कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. 

दुखद बातमी : ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

पनवेल शहरातून रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी वापरात असलेले तिन्ही रस्ते अतिक्रमण आणि विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेले आहेत. उपनगरी रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आणि कोकण रेल्वेवरील महत्त्वाचा टप्पा ठरणारे स्थानक अशी ओळख पनवेलची आहे. मात्र, पनवेल शहरातून स्थानकाकडे जाणारे रस्ते मात्र नेहमी दुर्लक्षित राहिले होते. 600 मीटर लांबीच्या या रस्त्याचे काम पूर्ण होत आल्याने पनवेलकरांची या समस्येतून लवकरच मुक्तता होणार आहे. 

गुन्हे बातमी : ज्वेलर्सनेच रचला १८ तोळे दागिने चोरीचा बनाव; वाचून तुम्हीही व्हाल थक्क ..!

कामाचे स्वरूप 
*  600 मीटर लांब 18 मीटर रुंद 
*  सांडपाण्याच्या वाहिन्या, भूमिगत गटारे, विद्युत जोडण्या, टेलिफोनच्या वाहिन्या, अतिक्रमणे या अडथळ्यांचे नियोजन करत दुतर्फा बंदिस्त गटारांचे कामही पूर्ण झाले आहे. 
*  पथदिवे, पदपथ यांची कामे जवळजवळ पूर्ण झाली असून, विभाजकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

विभाजकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, महिनाभरात हे सुद्धा काम पूर्ण होईल अशी आशा आहे. 
- तेजस भंडारी, प्रकल्प अभियंता 

(संपादन : उमा शिंदे)