आजारी माया तर बोलावतेय, पण लॉकडाऊनमुळं जाता येईना; भेटीसाठी पोराची धडपड

lockdown
lockdown
Updated on

तुर्भे : लातूर येथील गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या आपल्या आईला भेटण्याची तीव्र इच्छा असलेल्या नवी मुंबईतील तिच्या मुलाला गावी जाण्यासाठी आता कोरोनाच मोठा अडसर ठरला आहे. प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण माहिती देऊनही केवळ लॉकडाऊनमुळे या मुलाला गावी जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तरीही मुलाचे ई-पास मिळवून गावी जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बालाजी जाधव हे घणसोलीतील सेक्टर 4 मधील अर्जुन सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतात. तर त्यांची आई राजाबाई बाई जाधव या लातूर जिल्ह्यात  उदगीर तालुक्यातील एकपुरका या त्यांच्या मुळ गावात राहतात. राजाबाई या सध्या गंभीर आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या लातूर मधील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना व मुलींना बोलावून घ्या, असे सांगितले आहे.

इकडे आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी बालाजी जाधव व त्यांची पत्नी नीता यांनी ऑनलाईन ई-पासकरिता प्रशासनाकडे अर्ज केला. परंतु त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन महिती देण्यास सांगण्यात आल्याने बालाजी यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात पुन्हा अर्ज केला. तेथील प्रक्रियेनंतर अंतिम ई पासच्या परवानगीसाठी त्यांना वाशी येथील पोलिस उपायुक्त कार्यालय, परिमंडळ 1 मध्ये जाण्यास सांगितले.
त्यानुसार बालाजी हे शनिवारी दुपारी कार्यालयात गेल्यानंतर तेथील कर्मचऱ्यांनी त्यांना रविवारी सकाळी बोलावले. पण रविवारी त्यांचा फोन कोणीही कर्मचारी घेत नसल्याने बालाजी पुरते गोंधळले आहेत.

बालाजी जाधव यांच्या अर्जासबंधी योग्य ती शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त

 To a sick mother in Latur and men struggles to meet

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com