
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी)1026 खाटांचे रुग्णालय मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित झाले आहे.तेथील 1000 रुग्णांसाठी 100 डॉक्टरांसह त्याच प्रमाणात परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 1000 खाटांच्या नव्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करत आहे. या विस्तारित रुग्णालयात 100 खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू केला जाण्याची शक्यता असून, कोव्हिड चाचणीव्यतिरिक्त सर्व आवश्यक चाचण्या व उपचार होणार आहेत.
बीकेसीतील मैदानावर सव्वा लाख चौरस फूट जागेवर अवघ्या 15 दिवसांत एमएमआरडीएने हे रुग्णालय उभारले आहे.पावसाळी तंबूच्या स्वरूपात उभारलेल्या या रुग्णालयासाठी 20 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.तीन महिन्यांनी फक्त तंबूचे भाडे द्यावे लागणार असून, इतर सर्व साहित्याची खरेदी करण्यात आली आहे.तेथील 1026 खाटांसाठी महापालिका 100 डॉक्टरांची नियुक्ती करणार असून, त्यात एमडी (मेडिसीन) व भूलतज्ज्ञांचाही समावेश असेल.सध्या या रुग्णालयासाठी 13 डॉक्टर, 8 परिचारिका आणि 14 वॉर्डबॉयची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीकेसी येथील रुग्णालयासाठी आवश्यकतेनुसार डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल, असे महापालिकेच्या उप आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांनी सांगितले.या रुग्णालयाची जबाबदारी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ.राजेश ढेरे यांना देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.
एमएमआरडीए या रुग्णालयाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.रुग्णालयाच्या बाजूला 1000 खाटांचे विस्तारित रुग्णालय बांधण्याचा विचार असून, तेथे 100 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
10 मोबाईल आयसीयू
या कोव्हिड रुग्णालयात 10 मोबाईल आयसीयू युनिट आहेत.अधिक गरज भासल्याच जवळील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटने त्यांचे आयसीयू उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन महापालिकेला दिले आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
100 doctors for 1000 patients, BKC hospital starts within two days
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.