
मुंबई: आज राज्यात कोरोना बाधित रुग्णांनी उच्चांंक गाठला असून दिवसभरात 1008 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 11,506 झाली आहे. तर आज 26 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा पावणे पाचशे वर पोहोचला आहे.
आज राज्यात 26 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी पुणे शहरातील 10,मुंबईचे 5, जळगाव जिल्ह्यातील 3 तर पुणे जिल्ह्यातील 1, सिंधुदुर्ग मधील 1, भिवंडी महानगरपालिकेतील 1, ठाणे मनपामधील 1, नांदेड मधील 1, औरंगाबाद मनपामधील 1 तर 1 मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 18 पुरुष तर 8 महिला आहेत. आज झालेल्या 26 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत तर 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक जण 40 वर्षांखालील आहे. या 26 रुग्णांपैकी 15 जणांमध्ये (58 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 485 झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,53,125 नमुन्यांपैकी 1,40,587 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 11,506 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज राज्यात 106 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 1879 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 792 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 10,849 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 45.34 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
आजपर्यंत राज्यातून 1879 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1,63,026 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 11,677 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.