आजोबांची कमाल..! तब्बल 103 व्या वर्षी केली कोरोनावर यशस्वी मात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातून नुकतेच 100 वर्षाची आजीबाईसह 91 आणि 85 वर्षाच्या महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

ठाणे : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजाराबाबत नागरिकांच्या मनात विविध शंका आणि भीती निर्माण झाली आहे. त्यात याची लागण झाल्यानंतर आपण बरे होवू ना, अशा अनेक प्रश्नांनी लोकांच्या मनात काहूर माजवत आहे. दुसरीकडे मात्र ठाण्यातील कौशल्य रुग्णालयात सुकासिंग छाबरा हे 103 वर्षाचे आजोबा इच्छाशक्तीच्या जोरावर व डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या योग्य उपचारामुळे कोरोनावर यशस्वी मात करीत घरी परतले आहे. 

नियम मोडणाऱ्या खासगी बसगाड्यांवर कारवाई करायची कोणी? प्रादेशिक परिवहन विभागापुढे पेच...

ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातून नुकतेच 100 वर्षाची आजीबाईसह 91 आणि 85 वर्षाच्या महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात सोमवारी ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव खोपट परिसरात राहणाऱ्या 103 वर्षाच्या सुकासिंग छाबरा यांनी जवळपास एक महिन्याच्या उपचारानंतर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. 

झोपडपट्टीपाठोपाठ आता इमारतींमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; महापालिकेनेच जाहीर केली आकडेवारी...

ठाण्यातील खोपट सिद्धेश्वर तलाव परिसरात राहणाऱ्या 103 वर्षाच्या सुकासिंग छाबरा यांना त्रास होवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 2 जून रोजी कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यावर उपचार करीत असताना त्यांना न्यूमोनिया असल्याचे निदान झाले. त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. 

...अन्यथा तुमची गाडी जळून खाक होऊ शकते; अग्निशमन दलाने दिला खबरदारीचा इशारा...

त्यांच्यावर रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. अमोल भानुशाली आणि डॉ. समीप सोहोनी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित लाला खोमाने यांच्या पथकाने अथक परिश्रम घेतले आणि अखेर 103 वर्षाच्या आजोबांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना विरुद्धची लढाई जिंकली. सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

(दिपक कुरकुंडे : सकाळ छायाचित्र सेवा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 103 years old grandpa fights with corona and successfully wins the fight and returns home