झोपडपट्टीपाठोपाठ आता इमारतींमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; महापालिकेनेच जाहीर केली आकडेवारी...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

मुंबईतील सर्वाधिक रुग्णवाढीचा दर हा मुलुंडमध्ये आहे. येथे 3.8 टक्के दराने रुग्णांची वाढ होत आहेत. तर 19 दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. तर मुंबईत सरासरी 1.69 टक्के दराने रुग्ण वाढत आहेत. तर 41 दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत.

मुंबई : मुंबईतील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उच्चभ्रु इमारतीमध्ये आढळला. त्यानंतर या आजाराने शहर आणि उपनगरातील झोपडपट्टया आणि चाळींमध्ये हातपाय पसरवले. मुंबईतील बहुतांश रुग्ण दाट लोकवस्तीच्या परिसरात आढळत असताना आता मात्र पुन्हा इमारतींमध्येच रुग्ण आढळू लागले आहेत. मुलुंड परिसरातील 70 टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना सैफी हॉस्पिटलमध्ये केलं ऍडमिट, कारण आहे

महापालिकेच्या टी विभाग कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार संध्याकाळपर्यंत मुलुंडमध्ये 2 हजार 305 रुग्णांची नोंद झाली होती. त्यातील 1 हजार 610 रुग्ण हे इमारतींमध्ये राहाणारे आहे, तर 575 रुग्ण हे झोपडपट्ट्यांमधील आहेत.

...अन्यथा तुमची गाडी जळून खाक होऊ शकते; अग्निशमन दलाने दिला खबरदारीचा इशारा...

मुंबईतील सर्वाधिक रुग्णवाढीचा दर हा मुलुंडमध्ये आहे. येथे 3.8 टक्के दराने रुग्णांची वाढ होत आहेत. तर 19 दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. तर मुंबईत सरासरी 1.69 टक्के दराने रुग्ण वाढत आहेत. तर 41 दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत. मुलुंडमधील पश्चिम भागात सर्वाधिक म्हणजे 70 टक्के रुग्ण आढळले आहेत.

BIG BREAKING : ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यंत पुनश्च लॉकडाऊन; महापालिका आणि पोलिस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय...

कामगार रुग्णालयाचे कर्मचारी बाधित 
मुलुंड येथील ईएसआयसी कामगार रुग्णालयांची कर्मचारी वसाहत ही महापालिकेने सील केली आहे. या ठिकाणी कोरोनाचे 33 रुग्ण आढळले आहेत. तर इंदिरा नगर या भागात 99 रुग्ण आढळले आहेत. अमर नगर मुलुंड कॉलनी येथे 80 आणि मुलुंड कॉलनी येथील हिंदूस्थान चौकात 45 रुग्ण आढळले आहे.

वारकऱ्यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'ही' आहे मागणी..

मुलुंड परिसरातील रुग्णांची आकडेवारी

 • मुलुंड (पश्चिम) : 1091
 • मुलुंड (पूर्व) : 519
 • झोपडपट्ट्यांमधील रुग्ण : 552
 • इतर परिसरातील रुग्ण : 120
 • एकूण रुग्ण : 2305
 • रुग्णालयात उपचार सुरु असलेले : 1163 
 • मृत्यू : 95 
 • सील इमारती : 657 
 • प्रतिबंधित वस्त्या : 53 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infection increased in buildings in mumbai as per bmc details